सौरऊर्जेवरील कृषी पंपापासून शेतकरी वंचित

पारंपरिक नसेल तर सौरऊर्जेच्या माध्यमातून अपारंपरिक श्रेणीतील सौरऊर्जेचापर्याय उपलब्ध करून द्या, अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी देखील वर्षभरापासून प्रतीक्षाच आहे. पैशाचा भरणा करूनही ६६शेतकऱ्यांना सौर जोडणी देण्यात आली नाही.
सौरउर्जा पंपाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा  Farmers waiting for solar energy pump
सौरउर्जा पंपाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा Farmers waiting for solar energy pump

अमरावती  : पारंपरिक नसेल तर सौरऊर्जेच्या माध्यमातून अपारंपरिक श्रेणीतील सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून द्या, अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी देखील वर्षभरापासून प्रतीक्षाच आहे. पैशाचा भरणा करूनही ६६ शेतकऱ्यांना सौर जोडणी देण्यात आली नाही   विदर्भात उन्हाचे दिवस अधिक आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पारंपरिक ऐवजी अपारंपरिक ऊर्जेचा अर्थात सौरऊर्जेचा पर्याय कृषी पंपा करता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची अंमलबजावणी करण्यात आली.  शेतकऱ्यांनी देखील या योजनेला प्रतिसाद दिला. जिल्ह्यात एकूण ३ हजार ३१३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ६५७ अर्ज मंजूर तर ६३० अर्ज रद्द करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली त्यापैकी १ हजार ५३३ शेतकऱ्यांनी पैसे भरले. तर १ हजार ४८५ शेतकऱ्यांनी एजन्सीची निवड केली. सौर कृषी पंप कोणत्या एजन्सीमार्फत बसून घेणार हा पर्याय शेतकऱ्यांना  निवडावा लागतो. ४८ जणांनी कोणत्याही एजन्सीची  निवड न केल्याने महावितरण व एजन्सी यांच्या संयुक्त सर्वेक्षणानंतर ५० सौरपंपाचे प्रस्ताव पुन्हा रद्द करण्यात आले.  त्यानंतरही जिल्ह्यातील ६६ शेतकऱ्यांना वर्षभरापासून सौर कृषी पंप संदर्भातील यंत्रणा उपलब्ध करून देण्यात महावितरण व एजन्सी अपयशी ठरली आहे. दरम्यान, आतापर्यंत १ हजार ३४९ शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचा लाभ देण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी दिली.

सौर कृषिपंप योजनेची स्थिती

  • दाखल प्रस्ताव     ३३१३ 
  • त्रुटीमुळे रद्द प्रस्ताव    ६३०
  • लाभार्थी शेतकरी    १३४९ 
  • प्रतीक्षेत     ६६
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com