बुलडाणा महावितरणला साडेदहा हजार लिटर ऑइल उपलब्ध

केवळ ऑइल नसल्या कारणाने बुलडाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना जळालेले विद्युत रोहित्र, अर्थात ट्रान्स्फार्मर बदलून देण्यास महावितरणला अडचणी येत होत्या. राज्य शासनाने तातडीने १० हजार ५०० लिटर ऑइल उपलब्ध करून दिले आहे.
 बुलडाणा महावितरणला साडेदहा हजार लिटर ऑइल उपलब्ध Ten and a half thousand liters of oil available to Buldana MSEDCL
बुलडाणा महावितरणला साडेदहा हजार लिटर ऑइल उपलब्ध Ten and a half thousand liters of oil available to Buldana MSEDCL

बुलडाणा (प्रतिनिधी) : केवळ ऑइल नसल्या कारणाने बुलडाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना जळालेले विद्युत रोहित्र, अर्थात ट्रान्स्फार्मर बदलून देण्यास महावितरणला अडचणी येत होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत व अधिकऱ्यांची भेट घेतल्यानंतर राज्य शासनाने तातडीने १० हजार ५०० लिटर ऑइल उपलब्ध करून दिले आहे.   दोन दिवसांपूर्वीच तुपकर यांनी ऊर्जामंत्री राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ट्रान्सफार्मरचा प्रश्‍न मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्या मागणीला यश मिळाले असून, जळालेले विद्युत रोहित्रे बदलून देण्याचा मार्ग सुकर झाला. सध्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू आहे. शेतीपिकांना पाणी देण्यासाठी वीज लागते. परंतु विद्युत रोहित्रे जळण्याचे प्रमाण वाढल्याने व ते बदलून मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. बुलडाणा जिल्हा महावितरणला साडेदहा हजार लिटर ऑइल मिळाले आहे. त्यामुळे जळालेले विद्युत रोहित्रे बदलून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.     शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये विजेची खूप आवश्यकता असते. या वर्षीचा खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा रब्बी हंगामावरच आहेत. परंतु विद्युत रोहित्रे जळण्याचे प्रमाण वाढल्याने व ते बदलून मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. ऑइल नसल्या कारणाने बुलडाणा महावितरणने शेतकऱ्यांना विद्युत रोहित्रे बदलून दिली नाहीत. बुलडाणा जिल्ह्यासाठी जे ऑइल आले होते त्यातील बरेच ऑइल वाशीम जिल्ह्याला वरिष्ठ पातळीवरून वर्ग करण्यात आले. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातला शेतकरी ट्रान्सफॉर्मर साठी महावितरणकडे चकरा मारून मारून त्रस्त झाला होता. या शेतकऱ्यांनी आपली तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तुपकर यांच्याकडे केली होती. तक्रारीची दखल घेत तुपकरांनी थेट मुंबई येथे ऊर्जामंत्री राऊत, महावितरणचे एम.डी. असीम गुप्ता व साहित्य व्यवस्थापनाचे मुख्य अभियंता पराग जांभूळकर यांच्याशी चर्चा केली. बुलडाणा जिल्ह्याला तत्काळ ऑइल उपलब्ध करून द्या, अशी आग्रही मागणी तुपकरांनी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com