agriculture news in marathi, Ten dams of one hundred percent of Pune district | Agrowon

पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के
टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. पश्चिम पट्ट्यात असलेल्या एकूण २३ धरणांपैकी दहा धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित तेरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असून, ही धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत.

पावसाचे जवळपास अडीच महिने पूर्ण होत आहे. या काळात पावसाचा काही वेळा खंड पडल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. काही वेळा जोरदार पाऊस झाल्यामुळे दिलासा मिळाला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले खळाळून वाहू लागले होते. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरवात झाली.

पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. पश्चिम पट्ट्यात असलेल्या एकूण २३ धरणांपैकी दहा धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरित तेरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असून, ही धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत.

पावसाचे जवळपास अडीच महिने पूर्ण होत आहे. या काळात पावसाचा काही वेळा खंड पडल्याचे चित्र अनुभवायला मिळाले. काही वेळा जोरदार पाऊस झाल्यामुळे दिलासा मिळाला असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले खळाळून वाहू लागले होते. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढण्यास सुरवात झाली.

पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंध्रा, पवना, मुळशी, पानशेत, खडकवासला, नीरा, भाटघर ही धरणे पूर्ण भरली असून, या धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. उर्वरित असलेल्या पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, विसापूर, भामा आसखेड, कासारसाई, टेमघर, वरसगाव, गुंजवणी, वीर, नाझरे या धरणांतील पाणीसाठा जवळपास ५० टक्केहून अधिक झाला आहे.

येत्या आठवडाभर या भागात पाऊस सतत राहिल्यास ही धरणेसुद्धा भरण्याची शक्यता आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी (ता. १३) दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुळशी तालुक्यातील मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४३, तर वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४२ मिलिमीटर पाऊस पडला आहे. नीरा देवधर, पवना, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, आंध्रा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे भात पिकांना चांगलाच दिलासा मिळाला असून, पिकेही वाढीच्या अवस्थेत आहे.  

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये ः टेमघर १००, मुळशी ४३, वडीवळे ४२, पवना २८, वरसगाव २६, पानशेत २१, गुंजवणी १९, नीरा देवधार ३२, कळमोडी १४, आंध्रा ११, पिंपळगाव जोगे ८, माणिकडोह ६, येडगाव ३, डिंभे ५, विसापूर १, चासकमान २, भामाआसखेड ९, कासारसाई ६, खडकवासला ६, भाटघर ८, नाझरे ३.

इतर अॅग्रो विशेष
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...
इथेनॉल उत्पादन घटणारपुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...
अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...
पीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...
किमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...