Agriculture news in marathi Ten days of severe lockdown in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात दहा दिवसांचा  कडकडीत लॉकडाउन 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता बुधवारपासून (ता. ५) पुढील दहा दिवस कडकडीत लॉकडाउन पाळण्याचा निर्णय मंगळवारी (ता. ४) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सकाळी अकरापासून लॉकडाउनला सुरुवात होणार आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता बुधवारपासून (ता. ५) पुढील दहा दिवस कडकडीत लॉकडाउन पाळण्याचा निर्णय मंगळवारी (ता. ४) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सकाळी अकरापासून लॉकडाउनला सुरुवात होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

जिल्ह्यात वाढणारी कोरोना रुग्णसंख्या त्या प्रमाणात प्राणवायू आणि रेमडेसिव्हीरची भासणारी कमतरता पाहता सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते. महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘जिल्ह्यामध्ये सध्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रुग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी बुधवारी अकरा वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाउन करावा.’’ मुश्रीफ म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाउनचा पर्याय सुचवला आहे. रुग्णसंख्या थांबविण्यासाठी लॉकडाउनचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांनी त्याची अंमलबजावणी करावी.’’ यड्रावकर म्हणाले,  ‘‘लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना सूट देऊन लॉकडाउन कडकडीत करावा.’’ जिल्हाधिकारी देसाई यांनी या वेळी सविस्तर माहिती दिली. देसाई म्हणाले, ‘‘गेले दोन दिवस रुग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्ह दर कमी नाही. जिल्ह्यातील २४०० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.’’ 
 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...