agriculture news in marathi, Ten District rabbi crop insurance issue | Page 2 ||| Agrowon

रब्बी विम्यासाठी दहा जिल्हे रखडणार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

विमा कंपन्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे. दोन क्लस्टर्ससाठी निविदा आलेल्या नाहीत. या क्लस्टर्समध्ये एकूण दहा जिल्ह्यांचा समावेश होतो. विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणींवर सविस्तर चर्चा केली. ई-निविदेला मुदतवाढ दिली आहे. या मुदतीत दहा जिल्ह्यांसाठी कंपन्यांकडून निविदा प्राप्त होतील, असा विश्वास आहे.
- सुहास दिवसे, कृषी आयुक्त

पुणे (प्रतिनिधी) : ऑक्टोबरमधील चांगल्या पाऊसमानामुळे रब्बी हंगाम चांगला असेल असे संकेत सरकारनेच दिले असतानाच राज्यात यंदा रब्बी हंगामात दहा जिल्ह्यांतील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेतून या दहा जिल्ह्यांसाठी एकाही विमा कंपनीने निविदा भरलेली नाही. या जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने फेरनिविदा काढून दोन वेळा मुदतवाढ देऊनही कंपन्या विमा योजनेत सहभागी झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची वेळ कृषी खात्यावर ओढवली आहे.

राज्याचे सहा जिल्हा समूह (क्लस्टर) तयार करून पीकविमा योजना राबवली जात आहे. यातील दोन क्रमांकाच्या क्लस्टरमध्ये सोलापूर, लातूर, हिंगोली, वाशिम, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर क्लस्टर क्रमांक चारमध्ये बीड, रत्नगिरी, चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन क्लस्टर्ससाठी विमा कंपन्यांनी निविदा सादर केलेल्या नाहीत.

 राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली २० ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय पीकविमा समन्वय समितीची बैठक झाल्यानंतर सहा क्लस्टर्ससाठी ९ सप्टेंबर रोजी ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या १८ विमा कंपन्यांपैकी केवळ तीन कंपन्यांनी २५ सप्टेंबरपर्यंतच्या मुदतीत निविदा सादर केल्या.

नियमानुसार प्रत्येक क्लस्टरमध्ये किमान तीन कंपन्यांनी निविदा भरणे आवश्यक असते. त्यामुळे फेर ई-निविदा काढण्यात आली. त्यासही मुदतवाढ देऊन २३ ऑक्टोबर रोजी निविदा उघडण्यात आल्या. त्यामध्येही तीन क्लस्टर्समधील एकूण १५ जिल्ह्यांसाठी एकही निविदा आली नसल्यामुळे परत फेरनिविदा काढण्यात आली. या निविदेमध्ये केवळ दोनच कंपन्यांनी भाग घेतल्याने पुन्हा एकदा ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही ई-निविदा ६ नोव्हेंबर रोजी उघडण्यात आली. त्यात पाच जिल्ह्यांच्या एका क्लस्टरसाठी कंपन्यांनी निविदा भरल्या, परंतु दोन क्लस्टर्समधील एकूण दहा जिल्ह्यांसाठी मात्र एकही निविदा आली नाही.

कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी गुरुवारी (ता. ७) विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीतील चर्चेनंतर आयुक्तांनी ई-निविदेला १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

प्रतिकूल हवामानामुळे जोखीम वाढलेली असल्याने आर्थिक गणित बिघडण्याच्या भीतीपोटी कंपन्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कातडी बचावू भूमिका घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच विमा योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर होणारा राजकीय हस्तक्षेप, शंभर टक्के विम्याची भरपाई मिळवून देण्याचे आश्‍वासन आदी प्रकारांमुळे विमा कंपन्या योजनेत सहभागी होण्यापासून कचरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विमा कंपन्यांचा प्रतिसाद असाच निराशाजनक राहिल्यास राज्यात पीकविमा योजनेची अंमलबजावणी करणे अशक्यप्राय होईल, अशी भीती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. राज्य सरकारने स्वतःच्या मालकीची विमा कंपनी स्थापन करून विमा योजना राबवावी, अशी मागणी होत असली तरी हा प्रस्ताव आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.     


इतर अॅग्रो विशेष
उन्हाचा चटका, उकाडाही वाढलापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने...
संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात...शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीत शनिवारी (...
आता तरी सोडा धरसोडीचे धोरणसध्या बाजारात तुरीची आवक सुरू झाली असून अपेक्षित...
ग्रामीण विकासाचा ‘पर्यटन’ मार्गगेल्या आठवड्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात...
तापमानात चढ-उतार शक्यपुणे  : उत्तरेकडील थंड वाऱ्याचा अभाव, ढगाळ...
कामाच्या माध्यमातून दिसावे कृषी...नाशिक  : विशिष्ट शेतकऱ्यांसाठीच कृषी विभाग...
अडीच लाख टन कडधान्य बंदरांमध्ये पडूनपुणे  : देशातील कडधान्य बाजारपेठेच्या...
...त्यानंतर बँका, कार्यालयांमध्ये ७/१२...कडेगाव, जि. सांगली  ः राज्यात ऑनलाइन सातबारा...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...
शेतकरी गट ते कंपनी चांगदेवच्या...चांगदेव (जि. जळगाव) येथे शेतकऱ्यांनी सातत्याने...
कडधान्य धोरणात स्थिरता, पारदर्शकता आणा...पुणे : भारतीय कडधान्य धोरणात स्थिरता व पारदर्शकता...
कीडनाशकांमधील फसवणुकीला आळा; विधेयकाला...नवी दिल्ली : सुरक्षित आणि परिणामकारक कीडनाशके...
उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची...पुणे : कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात ढगाळ...
व्हॅलेंटाइन डेसह विविध रंगी गुलाबांना...वासाळी (ता. जि. नाशिक) येथील संजीव गजानन रासने...
संशोधनासाठीसुद्धा आता हवा जनरेटामागील वर्षी स्पेनमधील माद्रिद येथे संयुक्त...
आता वाढवा कामाचा वेगमहाविकास आघाडी सरकारने राज्यातील सरकारी अधिकारी-...
वृक्षसंवर्धनासाठी अनोखे संमेलनअमेरिकेमधील टेक्सास प्रांतात मी एक उद्यान पहावयास...
क्रियेवीण वाचाळता व्यर्थचभारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्थेच्या माध्यमातून...
राज्यात विक्रमी ३६ लाख क्‍विंटल कापूस...नागपूर ः बाजारात दर कोसळल्याने सीसीआय आणि पणन...
राज्य शासकीय कार्यालयांसाठी आता पाच...मुंबई  : राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच...