agriculture news in marathi Ten doors of Hatnur Dam opened wide | Agrowon

हतनूर धरणाचे दहा दरवाजे पूर्ण उघडले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 जुलै 2021

भुसावळ, जि. जळगाव : हतनूर धरणाचे दहा दरवाजे पूर्ण उघडण्यात येऊन, तापी नदीपात्रात १७ हजार ९२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भुसावळ, जि. जळगाव : भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पातळी वाढली आहे. धरणाचे दहा दरवाजे पूर्ण उघडण्यात येऊन, तापी नदीपात्रात १७ हजार ९२ क्युसेक पाणी सोडले जात आहे. त्यामुळे तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने मर्जी दाखवीत, शेती पिकासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जळगाव जिल्ह्यात आगमन केले आहे. सध्या जिल्हाभरात चांगला पाऊस आहे.  

धरणातील पाणीसाठा आणि विसर्ग 

हतनूर धरणातून भुसावळ तालुक्यासह रेल्वे, वरणगाव आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक केंद्रांसह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, यावल, सावदा मोठ्या पालिका व बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर एमआयडीसी तसेच तब्बल १३० गावांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणाची पातळी २०९.१९० मीटरवर जाऊन, ४४.५१ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. धरणात पाण्याची आवक वाढत आहे. १७ हजार ९२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे, तर कालव्याद्वारे ३०० क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडले जात आहे.


इतर बातम्या
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...