कोल्हापूर : गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९
ताज्या घडामोडी
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा हमीभाव केंद्रे
औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात दहा हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मका उत्पादकांना संबंधित केंद्रावर नाव नोंदणी करता येणार आहे. त्याच तारखेपर्यंत हमी दराने खरेदीही संबंधित यंत्रणेला करता येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात दहा हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मका उत्पादकांना संबंधित केंद्रावर नाव नोंदणी करता येणार आहे. त्याच तारखेपर्यंत हमी दराने खरेदीही संबंधित यंत्रणेला करता येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
जिल्ह्यात जवळपास १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याचे पीक होते. सुरवातीला त्यावर लष्करी अळीचे आक्रमण झाले. त्यामधून वाचलेल्या मक्याला ऑक्टोबरमधील जोरदार पावसाने धो- धो धुतले. त्यामुळे मका उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. मक्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीत भरच पडली. त्यास किमान आधारभूत दर मिळावा, यासाठी जिल्ह्यात दहा खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये गंगापूर, लासूर, वैजापूर, पैठण, कन्नड, खुल्ताबाद, करमाड, फूलंब्री, सोयगाव व सिल्लोड या केंद्रांचा समावेश आहे.
या केंद्रांवर मका उत्पादकांना ऑनलाइन नोंदणी, तसेच खरेदी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. स्वच्छ व १४ टक्के आर्द्रता असलेले, न डागाळलेले मका पीक या केंद्रांवरून १७६० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होईल.
ऑक्टोबरमधील पावसाने अजूनही अनेक भागांतील जमीन वापशावर नाही. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मक्याचे पीकही भिजून त्याला कोंब आले होते. बाजारात येणाऱ्या मक्यात १८ टक्क्यांपर्यंत आर्द्रता येत आहे. हमी दराने खरेदीसाठी १४ टक्के आर्द्रतेची अट घातली गेली आहे.
उडीद, सोयाबीन, खरेदीला मिळेना प्रतिसाद
जिल्ह्यात हमी दराने खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या केंद्रांवरील उडीद, सोयाबीनच्या खरेदीला शेतकऱ्यांकडून नाव नोंदणीसाठी प्रतिसादच मिळाला नाही. केवळ खुल्ताबाद येथील केंद्रावर १४ शेतकऱ्यांनी मुगाची हमी दराने खरेदी करण्यासाठी नोंदणी केली. या शेतकऱ्यांकडून १११ क्विंटल ५० किलो मुगाची हमी दराने खरेदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे सोयाबीन व उडदाच्या खरेदीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची मुदत वाढविली असतानाही शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
- 1 of 586
- ››