नगर जिल्ह्यातील ३७ छावण्याचालकांना दहा लाखांचा दंड

नगर जिल्ह्यातील छावण्याचालकांना दहा लाखांचा दंड
नगर जिल्ह्यातील छावण्याचालकांना दहा लाखांचा दंड

नगर : पशुधनाच्या सेवेत कुचराई करणाऱ्या ३७ छावणीचालक संस्थांना दहा लाख ६८ हजार १९५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही दंडात्मक कारवाई जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने करण्यात आली. 

पशुधन जगविण्यासाठी जिल्ह्यात चारा छावण्या सुरू आहेत. छावण्यांची मंजुरी घेताना स्वीकारलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याचे तपासणीअंती निदर्शनास आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. 

नगर जिल्ह्यामध्ये गतवर्षी पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी व चाराटंचाई डिसेंबरपासूनच जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील स्थितीचा जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला अहवाल पाठवला. त्यानंतर राज्य सरकारने २५ जानेवारी रोजी छावण्या सुरू करण्यास मंजुरी दिली. त्यावर द्विवेदी यांनी आजअखेर ५११ चारा छावण्यांना मंजुरी दिली. त्यातील जून सुरवातीला जिल्ह्यात ५०४ चारा छावण्या सुरू होत्या. त्यात दाखल झालेले पशुधन सव्वा तीन लाख होते. नगर, जामखेड, पारनेर, कर्जत, पाथर्डी, श्रीगोंदे, शेवगाव या तालुक्‍यांत छावण्यांची संख्या सर्वाधिक होती. 

दरम्यान, नंतरच्या काळात नेवासे, संगमनेर येथेही चारा छावण्या सुरू झाल्या. पशुधनास नियमाप्रमाणे सोयी-सुविधा दिल्या जात आहेत का? यावर जिल्हा प्रशासनाचे लक्ष होते. द्विवेदी यांनीदेखील काही चारा छावण्यांची अचानक भेट देत तपासणी केली. छावण्यांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने विविध पथके नेमली होती. पथकांकडून प्रशासनाकडे तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्रुटी आढळणाऱ्या छावण्यांना तुमच्यावर कारवाई का करू नये, या आशयाची नोटीस पाठवली होती. यापूर्वीच १३६ छावणीचालक संस्थांना ४५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पथकांच्या अहवालानुसार नुकतीच ३७ चारा छावणीचालक संस्थांवर दंडाची कारवाई केली आहे. हा दंड चारा छावण्या चालवण्यासाठी संबंधित संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानातून वसूल केला जाणार आहे.

सतत दंड करूनही... दुष्काळग्रस्त भागात पशुधन जगविण्यासाठी जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मागील आठवड्यात बऱ्याच भागात पाऊस झाला. त्या काळात अनेक शेतकऱ्यांनी जनावरे घरी नेली. अशा धावपळीत कोणीच तपासणीला येणार नाही असा कयास बांधून छावणीचालकांनी बोगस जनावरे दाखवणे, सुविधा न देण्याचे प्रकार केले. विशेष म्हणजे नगरमध्ये जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सातत्याने छावण्याची तपासणी करून दंड केलेले आहेत.

दंड झालेल्या छावण्यांची संख्या 
कर्जत २७
श्रीगोंदे ४ 
जामखेड २ 
शेवगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com