agriculture news in marathi Ten new born child died in Bhandara Hospital fire | Agrowon

धुरात घुसमटले दहा चिमुकले श्‍वास; भंडाऱ्यातील रुग्णालयात अग्नितांडव  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जानेवारी 2021

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी (ता. ९) रात्री लागलेल्या आगीमध्ये १० बालके दगावली असून सात जणांना वाचविण्यात आले आहे.

भंडारा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता कक्षाला शनिवारी (ता. ९) रात्री लागलेल्या आगीमध्ये १० बालके दगावली असून सात जणांना वाचविण्यात आले आहे. या घटनेमुळे अवघे राज्य सुन्न झाले आहे. राज्य सरकारने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. 

रुग्णालयाच्या कक्षातून रात्री अडीचच्या सुमारास धूर येत असल्याचे पाहून परिचारिकेने लगेच डॉक्टरांना माहिती दिली. यानंतर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग विझविली. मात्र यात होरपळल्याने तीन बालकांचा मृत्यू झाला तर कक्षातील धुरामुळे श्वास गुदमरून इतर सात चिमुकले मरण पावले. या घटनेनंतर शेजारच्या कक्षातील इनक्युबेटर व इतर यंत्रसामग्री अन्यत्र हलवून पेइंग वॉर्डात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली व बचावलेल्या सात बालकांना तेथे हलविण्यात आले. मृतांमध्ये आठ मुली व दोन मुलांचा समावेश आहे. 

सर्वप्रथम परिचारिकेला समजले 
या रुग्णालयात अतिदक्षता कक्षाच्या बाजूला परिचारिकांसाठी छोटा कक्ष आहे, आग लागली तेव्हा तिथे दोन परिचारिका होत्या. त्यातील एकीला कक्षातून धूर येत असल्याचे दिसल्यामुळे तिने आत जाऊन बघितले असता तिला एक इनक्युबेटर जळत असल्याचे दिसले. तिने लगेच ही माहिती डॉक्टरांना दिल्यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत दहा कोवळ्या जिवांचा अंत झाला होता. 

रुग्णालयात आग प्रतिबंधक यंत्रणा नाही 
या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नव्हते. रुग्णालयात आग तसेच इलेक्ट्रिकल सामग्रीचे ऑडिट करण्यासाठी ८ मे २०२० ला एक कोटी ५२ लाख रुपये खर्चाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. परंतु, निधी मंजूर न झाल्याने ही कामे झालीच नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जाते. या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. 
 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...