जिंतूरात शेतकऱ्यांकडून दहा टक्के कमिशन वसुली

जिंतूरात फळे-भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून दहा टक्के कमिशन वसुली
जिंतूरात फळे-भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांकडून दहा टक्के कमिशन वसुली

जिंतूर, जि. परभणी ः जिंतूर येथील मार्केटमधील व्यापारी भाजीपाला आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या शेतमालाच्या रकमेतून १० टक्के रक्कम कमिशन म्हणून वसूल करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे  मंगळवारी (ता. २६) तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

जिंतूर तालुक्यात मागील तीन ते चार वर्षांपासून सतत दुष्काळी स्थिती आहे. प्रतिकूल परिस्थितीत हार न मानता तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी फळे, भाजीपाला यांचे उत्पादन घेऊन आपली उपजीविका करत आहेत. परंतु, बाजारात शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिंतूर येथील मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीस आणलेल्या फळे भाजीपाला या नाशवंत शेतमालावर कच्चा पावत्यांच्या आधारे बेकायदेशीररित्या व्यापाऱ्यांकडून शेकडा १० टक्के रक्कम कमिशन स्वरूपात वसूल करण्यात येत आहे.

या अडत व्यापाऱ्यांकडे बाजार समितीचा किंवा शासनाच्या इतर कुठलाही परवाना नसताना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली जात आहे. संबंधित व्यापाऱ्याकडील कच्‍च्‍या पावत्या, जुने दस्तावेज जप्त करून कार्यवाही करावी. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे तालुकाध्यक्ष गुलाबराव शिंदे सचिव मंचकराव देशमुख, उपतालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे, शेख गफार शेख अफजल, किशनप्रसाद खाडे, रमेश देवकते, जनार्दन माकोडे, रंगनाथ काळदाते, शेषराव सडाळ, मधुकर गोरे, तुकाराम गायकवाड आदि तालुका प्रशासनाकडे केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com