agriculture news in Marathi ten thousand quintal jowar damage Maharashtra | Agrowon

दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्सा

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जानेवारी 2021

जिल्ह्यात २०१५ ते २०१७ दरम्यान भरडधान्य योजनेतून खरेदी केलेल्या ज्वारीला नियतन न मिळाल्याने तिचा अक्षरशः भुस्सा झाला.

अकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७ दरम्यान भरडधान्य योजनेतून खरेदी केलेल्या ज्वारीला नियतन न मिळाल्याने तिचा अक्षरशः भुस्सा झाला. अखेरीस ही ज्वारी मातीमोल भावात विकून गोदाम खाली करण्याची वेळ शासकीय यंत्रणांवर येऊन ठेपली. सुमारे १० हजार क्विंटलपेक्षा अधिक ज्वारीबाबत हा प्रकार घडला आहे.

शेतकरी घाम गाळून धान्य पिकवतो. शासनही आधारभूत किमतीने दरवर्षी भरडधान्याची खरेदी करते. परंतु खरेदी केलेल्या धान्याची योग्य निगा तसेच त्याबाबत वेळेवर निर्णय होत नसल्याचा आर्थिक फटका बसतो आहे. असाच प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. जिल्ह्यात सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षात खरेदी करण्यात आलेली जागेवरच भुस्सा झाली. १० हजार ८५७ क्विंटल ज्वारी उपरोक्त वर्षात खरेदी करून गोदामात ठेवण्यात आली होती.

ज्वारी शिल्लक असलेल्या या कालावधीमध्ये नियतन (डीओ) प्राप्त न झाल्यामुळे ज्वारी विल्हेवाटविना पडून राहली. यावर तीन ते चार वर्षांचा कालावधी लोटला. त्यामुळे जागेवरच खराब झाली. या ज्वारीचे नमुने पुण्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा प्रयोग शाळा, तसेच पशु संवर्धन सहआयुक्त प्रयोग शाळेला पाठविले असता ही ज्वारी मानवास, तसेच पशुपक्ष्यांना खाण्यास अयोग असल्याचा तपासणी अहवाल देण्यात आला.

खरेदी १५७० ने, मात्र २२ रुपये क्विंटलने विकण्याची वेळ
गेल्या महिन्यात या ज्वारीच्या विल्हेवाट लावण्यावर शिक्कामोर्तब झाले. मिळालेल्या माहितीनुसार तेव्हा १५७० रुपये दराने खरेदी झालेली ही ज्वारी आता भुस्सा झाल्याने अवघ्या १९ ते २२ रुपये प्रतिक्विंटल दराने विकून जागा मोकळी करण्याची वेळ शासकीय यंत्रणांवर आली आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...
‘पीएम-किसान’मध्ये महाराष्ट्राचा डंका पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत (पीएम-...