Agriculture news in marathi Ten thousand quintals of gram paid in Parbhani, Hingoli district | Agrowon

परभणी, हिंगोली जिल्ह्यात दहा हजार क्विंटल हरभऱ्याचे चुकारे अदा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 जून 2020

परभणी : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गंत परभणी, हिंगोली जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या १३ केंद्रांवर शनिवार (ता.२७) पर्यंत ६ हजार ३३ शेतकऱ्यांच्या ८३ हजार ९६२ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली.

परभणी : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गंत परभणी, हिंगोली जिल्ह्यातील राज्य सहकारी पणन महासंघाच्या १३ केंद्रांवर शनिवार (ता.२७) पर्यंत ६ हजार ३३ शेतकऱ्यांच्या ८३ हजार ९६२ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. आजवर ७४० शेतकऱ्यांच्या १० हजार ७७४ क्विंटल हरभऱ्याचे ५ कोटी २५ लाख २७ हजार २४९ रुपयांचे चुकारे देण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

हमीभावाने हरभरा विक्रीसाठी राज्य सहकारी पणन महासंघाच्या परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा, बोरी येथील केंद्रांवर एकूण ११ हजार ६८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी पालम वगळता अन्य ७ केंद्रांवर शनिवार (ता.२७) पर्यंत २ हजार ३७५ शेतकऱ्यांचा २९ हजार ८३० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळा बाजार, सेनगाव, साखरा या ६ केंद्रांवर ९ हजार ८४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ३ हजार ७०८ शेतकऱ्यांचा ५४ हजार १३१ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. 

हरभऱ्याचे ५ कोटींचे चुकारे अदा 

परभणी जिल्ह्यातील ३४८ शेतकऱ्यांना ४ हजार ४४४ क्विंटल हरभऱ्याचे २ कोटी १६ लाख ६४ हजार ५०० रुपयांचे, तर हिंगोली जिल्ह्यातील ३९२ शेतकऱ्यांना ६ हजार ३३० क्विंटल हरभऱ्याचे ३ कोटी ८ लाख ६२ हजार ७४९ रुपये देण्यात आले. 

तुरीचे २९ कोटी वाटप 

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांवर तूर विक्रीसाठी ३८ हजार १७३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी सोमवार (ता.१५) पर्यंत ११ हजार ६६० शेतकऱ्यांची ९८ हजार ८४ क्विंटल तूर खरेदी झाली. आजवर एकूण ५ हजार ६४९ शेतकऱ्यांना ५० हजार ८० क्विंटल तूरीचे २९ कोटी ४ लाख ६६ हजार ६६८ रुपयांचे चुकारे दिले गेले. त्यात परभणी जिल्ह्यातील २ हजार २६ शेतकऱ्यांच्या १० कोटी ४६ लाख २४ हजार रुपये आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार ६२३ शेतकऱ्यांच्या १८ कोटी ५८ लाख ४२ हजार रुपयांच्या चुकाऱ्यांचा समावेश आहे. 

केंद्रनिहाय हरभरा खरेदी (क्विंटलमध्ये) 

केंद्र शेतकरी संख्या हरभरा खरेदी
परभणी ४५४. ६३१४ 
जिंतूर १७५ २०५४
बोरी २६७ ३३६३ 
सेलू २१ २०७
पाथरी ६७४ ८७२५ 
सोनपेठ ३२८ ३४९२
पूर्णा ३६५ ४६२८
हिंगोली ९४७ १३८७२
कळमनुरी ९५६ १२३७६ 
वसमत ९७ १२२१
जवळाबाजार ५४२ ७०६९ 
सेनगाव ५७५ ९८५२ 
साखरा ५९१ ९७४० 

 


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...