चार वर्षांमध्ये एकदा तरी ‘हळद पिवळे करून जातेय’, अशी एक म्हण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे.
ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल
रिसोड तालुक्यात यंदा कांदा बीजोत्पादनाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा व्यावसायिक पिकांकडे कल वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी करार पद्धतीने कांदा बीजोत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेतला.
रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा बीजोत्पादनाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा व्यावसायिक पिकांकडे कल वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा भर जहागीर परिसरामध्ये शेतकऱ्यांनी करार पद्धतीने कांदा बीजोत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेतला असून, या परिसरात सुमारे १०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड झाली आहे. खासगी कंपन्यांसोबत शेतकऱ्यांनी करार करीत ही लागवड केली आहे.
भर जहागीर परिसरामध्ये मागील काही वर्षांपासून सिंचन वाढत आहे. सिंचन तलाव तयार झाल्याने त्याचा फायदा शेतीला होत आहे. बहुतांश शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी विविध खासगी बीज उत्पादन कंपन्यासोबत करार शेती करीत आहेत. बोरखेडी येथील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो, भेंडी, एरंडी, भोपळा, वांगी यासह इतर भाजी वर्गीय
पिकांच्या बीजोत्पादनासाठी करार पद्धतीने कंपन्यासोबत करार केले. प्रामुख्याने कांदा बीजोत्पादनाकडे कल वाढला आहे. शेतकऱ्यांनी कांदा कंपनीसोबत बियाण्याचा ५० हजार रुपये प्रतिक्विंटल बियाण्याचा करार केला आहे. कंपनीने तीन हजार ते ३ हजार २०० रुपयांपर्यंत बेणे पुरविले आहे. खासगी व्यापाऱ्यांनी २००० ते २ हजार ७०० रुपये दराने बियाणे पुरवीत ३० रुपये क्विंटलचा करार केला आहे.
मांगवाडी, भर जहागीर, मोरगव्हाण, वाडी, जवळा, कुऱ्हा, चाकोली सारख्या विविध गावांमध्ये कांदा उत्पादनाकरीता खासगी कंपनीसोबत करार पद्धतीचा शेतकऱ्यांनी स्वीकार केलेला दिसत आहे.
प्रतिक्रिया
मागील काही महिन्यांत कांदा बियाणे महागल्याने बहुतांश शेतकरी कांदा बीजोत्पादन घेण्याकडे वळाले आहेत. बाजार पेठेतील कांदा बियाण्याच्या दराचा अंदाज येत नसल्याने कंपनीसोबत दर ठरवून करार करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
इंदरकुमार कोकाटे, कांदा बीज उत्पादक, ता. रिसोड
- 1 of 1062
- ››