पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू

पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू

अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून जिल्ह्यातील सहा तालुक्यांत सुमारे २७८ ठिकाणी कामांचा प्रस्ताव आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामुळे रस्त्यांची कामे आता होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.   

पाणंद रस्ते हे यंत्रसामग्री शेतापर्यंत पोचविण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत. शेतमाल बाजारात पोचविणे, साधनांची शेतामध्ये ने-आण करणे, पेरणीपासून मळणीपर्यंतची कामे करणाऱ्या यंत्रांची शेतापर्यंत वाहतूक करणे आदी कामांसाठी शेत, पांदण रस्ते महत्त्वाची भूमिका बजावतात. पावसाळ्यात त्यांची सर्वाधिक गरज भासते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने पालकमंत्री शेत / पांदण रस्ते योजना शेतकऱ्यांसाठी आखली आहे. मध्यंतरी ही योजना रखडली होती. आता आर्थिक वर्ष संपायला आल्याने योजनेच्या कामाने गती घेतली आहे. 

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कामे केली जाणार आहेत. आतापर्यंत सहा तालुक्यांतून यासाठी २७८ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. याशिवाय या योजनेसाठी खर्च करावयाचा निधी बऱ्याच कालावधीपासून आला आहे. प्रस्ताव मंजूर करून त्याची निविदाप्रक्रीया न झाल्याने हा निधी पडून होता. आता ही बाब मार्गी लागली आहे. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग यासाठी निविदा प्रक्रीया राबविणार आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात पाणंद रस्त्यांसाठी आलेला निधी खर्च होण्याची अपेक्षा आहे. या रस्त्यांची कामे करवून घेण्यासाठी तालुका पातळीवर एक पॅनेल तयार करण्यात येईल. त्याचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असतील. त्यांच्या नियंत्रणाखाली ही कामे केली जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com