नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र सुरू होणार

नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र सुरू होणार
नांदेडमध्ये नाफेडतर्फे तूर खरेदी केंद्र सुरू होणार

नांदेड ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये नाफेडमार्फत तूर खरेदीची केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. खरेदी केंद्र निश्चित करण्यासाठी निकष ठेवण्यात आले आहेत. खरेदी करू इच्छिणाऱ्या संस्थेकडे किमान १० लाख रुपये खेळते भांडवल असणे आवश्यक आहे, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

खरेदी केंद्र मंजूर करताना जिल्हा, तालुकास्तरावरील अ वर्ग सभासद असलेले खरेदी-विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी अ वर्ग सभासद संस्था, अ वर्ग सभासद संस्था कार्यरत नसतील त्या ठिकाणी इतर सहकारी संस्थेस ब वर्ग सभासद करून घेऊन खरेदीचे काम देण्यास प्राधान्य देण्यात येईल. यामध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. 

खरेदी करणाऱ्या संस्थेकडे माॅयश्चर मीटर, चाळणी, ताडपत्री, संगणक, संगणक चालवणे क्षमता असलेल्या जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्टफोन, संगणक प्रशिक्षित सेवकवर्ग, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आदी साधनसामग्रीसह पुरेसे मनुष्यबळ असल्याचा सहायक निबंधक सहकारी संस्था यांचा, तर शेतकरी उत्पादक कंपन्यांना महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला आवश्यक आहे. तसेच एक वर्षाच्या अनुभवाची गरज नाही. 

वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीपूर्वी संस्थेचे स्वत:चे, भाड्याचे गोदाम असल्याबाबत, अन्नधान्य, कडधान्य व तेलबिया इत्यादी खरेदी विक्रीचा किमान १ वर्षाचा अनुभव, खरेदी केंद्र चालविण्यासाठी आवश्यक सेवक उपलब्ध असल्याचे जिल्हा उपनिबंधकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. काळ्या यादीत, अपहार, फौजदारी गुन्हा यासंबंधी कार्यवाही झालेली नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

संस्थेने द्यावयाच्या कागदपत्रांबाबत मागील तीन वर्षांचे सनदी लेखापाल, शासकीय लेखापरीक्षक यांनी साक्षांकित केलेली ताळेबंद पत्रके सादर करावीत.पॅनकार्डची प्रत, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेकडे १० लाख रुपये खेळते भांडवल असल्याबाबतचे बँकेचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे. असे, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com