‘टेंभू’चे आवर्तन पुढील आठवड्यात सुटण्याची शक्यता

The 'tenmbhu' rotation is likely to be released next week
The 'tenmbhu' rotation is likely to be released next week

सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र, पंपहाउसची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात टेंभूचे आवर्तन सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टेंभू योजनेतून सात तालुक्यांतील लाभ क्षेत्राला पाणी दिले जाते. त्यामुळे पंपहाउसमध्ये काही तांत्रिक बिघाड होत असतो. त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कालव्यातून पाणी गळती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे टेंभू योजनेच्या कॅनॉलच्या अस्तरीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे आवर्तनाला विलंब होणार आहे. 

दरम्यान, लाभ क्षेत्राला दोन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून पाणी पट्टी व वीजबिलाची कपात करून घेतलेली ५ कोटी ५० लाख इतकी रक्कम येणे बाकी आहे. संबंधित कारखान्यांनी ही रक्कम भरली की वीजबिलाच्या अंशतः थकबाकीचा प्रश्न निकाली निघून नियमितपणे आवर्तने सुरू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

तत्काळ आवर्तन सुरू करा

टेंभू योजनेचे रब्बी पिकासाठी आवर्तन लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी तालुक्‍यातील टेंभूच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. गेल्या पंधरवड्यापासून टेंभूचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. परंतु टेंभूच्या अधिकाऱ्यांनी मात्र जानेवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात आवर्तन सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

दोन कारखान्यांकडे ५.५० कोटी

दोन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून पाणी पट्टी व वीजबिलाची कपात करून घेतली. आहे. ५ कोटी ५० लाख इतकी रक्कम अद्याप टेंभूकडे भरलेली नाही. त्यामुळे टेंभूचे रब्बी हंगामासाठीचे आवर्तन सुरू करण्यात अडथळा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सध्या पाण्याअभावी अनेक ठिकाणी पिके वाळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी टेंभूचे आवर्तन कधी सुरू होणार, याकडे डोळे लावून आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com