शेतकरी बालकांच्या बाजारात दहा हजार रुपयांची उलाढाल

शेतकरी बालकांच्या बाजारात दहा हजार रुपयांची उलाढाल
शेतकरी बालकांच्या बाजारात दहा हजार रुपयांची उलाढाल

श्रीरामपूर, यवतमाळ : वडसद तांडा जिल्हा परिषद शाळेतील शेतकऱ्यांच्या मुलांनी भरविलेल्या बाल आनंद बाजाराला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात तब्बल दहा हजारांची उलाढाल झाली.    

माणिकडोह केंद्रातील वडसद तांडा शाळा उपक्रमशील म्हणून नावारूपास आली आहे.  मुख्याध्यापक शशिकांत जामगडे व सहायक शिक्षक साहेबराव राठोड यांनी या बाजारासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव यावा, यासाठी बाल आनंद बाजार भरविण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून गावच्या सरपंच सीमा राठोड, उपसरपंच बळीराम जाधव, श्रीरामपूरचे केंद्रप्रमुख निवृत्तिनाथ बैस्कार, काटखेडाचे केंद्रप्रमुख अमित बोजेवार, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव राठोड, मनोहर जाधव, सदस्य अरविंद जाधव उपस्थित होते. 

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, शाळेला धूरमुक्त करण्यासाठी गॅस कनेक्‍शन देणाऱ्या चिंतामणी सेवा मंडळाच्या सदस्यांचा या वेळी वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. चिमुकल्यांनी थाटलेल्या दुकानातून ग्राहकांनी शेतमालाची खरेदी केली. बालकांनी शेतातील सेंद्रिय खतांचा वापर करून पिकविलेल्या भाजीपाला विक्री केला. त्यात कांदे, टोमॅटो, मिरची, मेथी, पालक, वांगी, गाजर, तुरीच्या शेंगांचा समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com