agriculture news in Marathi term till 20 February for proposal of drip irrigation Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘ठिबक’च्या प्रस्तावासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत

तात्या लांडगे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

ठिबक अनुदानासाठी संबंधित शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाल्यानंतर एका महिन्यात त्यांनी ठिबक संच बसवणे अनिवार्य आहे. प्रस्ताव तालुकास्तरावर दिल्यानंतर कृषी सहायकांनी संबंधितांचा सातबारा उतारा पडताळणी करून मोका तपासणी करावी. अनुदानाचा अर्ज करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली असून मुदतीत प्रस्ताव सादर केल्यास तत्काळ अनुदान मिळेल. बनावट प्रस्ताव देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
- शिरिष जमदाडे, संचालक, फलोत्पादन

सोलापूर : या वर्षी ठिबक सिंचन केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत अंतिम देण्यात आली आहे. मार्चएण्डची लगबग सुरू असतानाच बनावट प्रस्ताव दाखल होण्याची शक्‍यता असल्याने मोका तपासणीवेळी कृषी सहायकांनी संबंधित शेतकऱ्यांचा सातबारा पडताळणी करून मालकी तपासावी, असे निर्देश कृषी विभागाने दिले आहेत. जानेवारीपासून कृषी विभागाने पूर्व संमती मिळूनही महिन्यात प्रस्ताव न दिलेल्या तब्बल ८० हजार शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झाले आहेत.

राज्यातील सततचा दुष्काळ, जमिनीची खोलवर गेलेली पाणीपातळी यांसह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांचा कल ठिबक सिंचनाकडे वाढू लागला आहे. २०१९- २० मध्ये राज्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन करून अनुदानासाठी अर्ज केले असून त्यापैकी ४५ हजार शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. पूर्वसंमती मिळूनही मुदतीत प्रस्ताव न दिलेल्या शेतकऱ्यांचे सर्वाधिक अर्ज जानेवारी व फेब्रुवारीत रद्द ठरविण्यात आले आहेत.

अनुदानाचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी मुदत जाहीर केल्याने महिन्याला ३० ते ३२ हजार अर्ज येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, कंपनी, कृषी सहायक तथा कृषी अधिकारी, काही शेतकऱ्यांकडून या कालावधीत बनावट अर्ज येऊ शकतात, या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने अधिकाऱ्यांना सक्‍त सूचना केल्या आहेत.

ठळक बाबी...

  • पूर्वसंमतीनंतर महिन्यात प्रस्ताव न दिल्यास अर्ज ठरणार रद्द 
  • राज्यातून आत्तापर्यंत ठिबक अनुदानाचे तीन लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी केले अर्ज. २०२०-२१ च्या अनुदानाची कार्यवाही २५ एप्रिलनंतर
  • अर्ज रद्द झालेल्यांचे अनुदान पात्र शेतकऱ्यांना वितरित : मार्चएण्डची लगबग
  • सातबारा पडताळून कृषी सहायकांनी करावी मोका तपासणी : कृषी विभागाचे निर्देश

इतर अॅग्रो विशेष
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...