Agriculture news in Marathi Termination of useful water storage in the lower milk project | Page 2 ||| Agrowon

निम्न दुधना प्रकल्पामधील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

परभणी ः परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पामधील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला असून रविवारी (ता. २४) सकाळी आठ वाजता उणे ७.८० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पाणीसाठ्यामध्ये दिवसागणिक झपाट्याने घट होत असल्याने या प्रकल्पावर पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या गावात पाणी टंचाईचे येत्या काळात अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

परभणी ः परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पामधील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला असून रविवारी (ता. २४) सकाळी आठ वाजता उणे ७.८० टक्के पाणीसाठा शिल्लक होता. पाणीसाठ्यामध्ये दिवसागणिक झपाट्याने घट होत असल्याने या प्रकल्पावर पाणीपुरवठ्यासाठी अवलंबून असलेल्या गावात पाणी टंचाईचे येत्या काळात अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याव्दारे २ हजार २०० क्युसेकने तर उजव्या कालव्याव्दारे ५०० क्युसेकने आवर्तन सुरू आहे. त्यामुळे रविवारी (ता. २४) सकाळी जायकवाडी धरणामध्ये ४२.१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. येलदरी धरणामध्ये ६१.४३ टक्के, सिद्धेश्वर धरणामध्ये ३५.०५ टक्के, माजलगाव धरणामध्ये २५.३२ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा होता.

गतवर्षीच्या पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयामध्ये जेमतेम १० ते १२ टक्के पर्यंत उपयुक्तसाठा जमा झाला होता. बेसुमार अवैध उपसा तसेच गेल्या काही दिवसांत तापमानात वाढ झाल्यामुळे उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. धरणसाठा उणे मध्ये गेला आहे. करपरा मध्यम प्रकल्पात २१ टक्के तर मासोळी मध्यम प्रकल्पात ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. जिल्ह्यातील २२ पैकी ११ लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या पैकी ६ प्रकल्प कोरडे पडले आहेत. ८ प्रकल्पांत २५ टक्के पर्यंत, १ प्रकल्पात २६ ते ५० टक्के २ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के पर्यंत उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...
बुलडाण्यात सोयाबीनबाबत २७०० पेक्षा अधिक...बुलडाणा ः निकृष्ट बियाणे तसेच इतर कारणांमुळे...
विदर्भात खत कमतरतेमुळे जादा दराने विक्रीनागपूर : विदर्भातील सर्व जिल्ह्यात सध्या युरियाची...
रत्नागिरी जिल्ह्यात पुरेसा खत पुरवठारत्नागिरी : खरीप हंगामाच्या सुरुवातीला वेळेत खत न...
सांगलीत खतांची कमतरतासांगली ः जिल्ह्यात ८० टक्के खतांचा पुरवठा केला...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास पोषक हवामान...
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...