भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइड ठार

सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना घेरले आणि चकमक सुरु ठेवली. अखेर सुरक्षा रक्षकांनी दहशतवादी लपलेले घरच उडवून देत उद्ध्वस्त केले. यात जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अब्दुल गाझीयाच्यासह अन्य दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
दहशतवादी अब्दुल गाझी
दहशतवादी अब्दुल गाझी

जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर आज (सोमवार) आणखी चार भारतीय जवानांना हुतात्मा करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला. दहशतवादी लपलेले घरच लष्कराने उडवून देत ‘नया हिंदुस्तान’ची झलक दाखविली आहे. भारतीय जवानांनी पुलवामा हल्ल्याचा बदला घेत जैशे महंमदचा म्होरक्या अब्दुल रशीद गाझी याच्यासह दोन दहशतवाद्यांना ठार केले. पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर केलेल्या गोळीबारात मेजरसह चार जवान हुतात्मा झाले आहेत. तर, या हल्ल्यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला. पिंगलान भागात रविवारी मध्यरात्रीपासून दहशतवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू होती. पिंगलान भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी शोधमोहीम राबविली असता दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांवर गोळीबार केला. या गोळीबारात एका मेजरसह तीन जवान हुतात्मा झाले. तर, एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. सुरक्षारक्षकांनी तीन दहशतवाद्यांना घेरले आणि चकमक सुरू ठेवली. अखेर सुरक्षारक्षकांनी दहशतवादी लपलेले घरच उडवून देत उद्ध्वस्त केले. यात जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अब्दुल गाझी याच्यासह अन्य दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. गाझी हा अफगाण युद्धात लढलेला असून, आयईडी स्फोटकांचा तज्ज्ञ आहे. त्यानेच पुलवामाचा हल्लेखोर आदिल दार याला प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझी ऊर्फ रशीद अफगाणी हा काही दिवसांपूर्वी झालेल्या एका चमककीत थोडक्‍यात बचावला होता. जैशे महंमदचा प्रमुख मसूद अझरच्या सर्वांत विश्‍वासू सहकाऱ्यांपैकी गाझी हा एक आहे. त्याला तालिबानने प्रशिक्षण दिले आहे. २०११ मध्ये पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये आल्यानंतर तो दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांमध्ये मार्गदर्शन करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मसूद अझरचा पुतण्या चकमकीत मारला गेल्यानंतर या घटनेचा बदला घेण्यासाठी गाझीला काश्‍मीर खोऱ्यात पाठविण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com