सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत चाचपणी

केंद्र सरकारने जनुकीय सुधारित सोयापेंडेच्या आयातीला परवानगी दिल्यापासून आयातदार विविध देशांमध्ये सोयापेंडची चाचपणी करत आहेत. बांगलादेश, व्हिएतनाम आणि अर्जेंटिना या देशांतून सोयापेंड आयातीचे करार झाले आहेत.
Testing of importers for soybean in many countries
Testing of importers for soybean in many countries

पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित सोयापेंडेच्या आयातीला परवानगी दिल्यापासून आयातदार विविध देशांमध्ये सोयापेंडची चाचपणी करत आहेत. बांगलादेश, व्हिएतनाम आणि अर्जेंटिना या देशांतून सोयापेंड आयातीचे करार झाले आहेत. तर इतर देशांमध्ये सोयापेंड उपलब्ध आहे का याची चाचपणी होत आहे. 

केंद्र सरकारने १२ लाख टन जनुकीय सुधारित सोयापेंडेच्या आयातीला परवानगी देत ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला होता. त्यानंतर नुकतेच सरकारने अधिसूचना काढून ३१ डिसेंबरपर्यंत आयात करार (बिल ऑफ लॅंडिंग) केलेल्या सोयापेंडेची आयात ३१ जानेवारी २०२२ पर्यंत करता येणार आहे. ब्राझील आणि अर्जेंटिनातून आयातीसाठी जास्त कालावधी लागणार होता. परंतु सरकारने आता आयात कालावधी वाढविल्याने येथून आयातीला वेळ मिळेल. आता या देशांतून आयातीसाठी भारतातील आयातदार ३१ ऑक्टोबरपर्यंत करार करत असतील तरी हा माल भारतात वेळेत दाखल होऊ शकतो.

ऑल इंडिया पॉल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनीसुध्दा सरकारच्या निर्णयाचे स्वागतच केले आहे. त्यांचे म्हणणे आहे, की आयातीसाठीचा कालावधी वाढविल्याने पोल्ट्री उद्योगाला दिलासा मिळेल. जनुकीय सुधारित सोयापेंडचा दर कमी असल्याने कमी दरात पोल्ट्री उद्योगाला कमी दरात पेंड मिळेल. आयातीसाठी कंटेनर आणि जहाजांच्या टंचाईची समस्या आहेच. त्यातच ब्राझील आणि अर्जेंटिना देशांतून सोयापेंड आयातीसाठी ६५ ते ७० दिवस लागतील, मात्र आयात कालावधी वाढविल्याने ही पेंड वेळेत भारतात दाखल होईल.

आतापर्यंत झालेले करार भारतीय आयातदारांनी बांगलादेशातील निर्यातदारांकडून १.२५ लाख टन सोयापेंडची खरेदी केली आहे. त्यानुसार देशात २९ ऑगस्टपासून दररोज जवळपास १५ हजार टन आयात होत आहे. तसेच व्हिएतनाममधून ७५ हजार टन आणि अर्जेंटीनामधून २ लाख टन सोयापेंड आयातीचे करार करण्यात आले आहे. ही पेंड ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत देशात पोचण्याची शक्यता आहे.

उत्पादकता, नुकसानीवर दराचे गणित अवलंबून प्रत्यक्ष आयातीचा कालावधी वाढविल्याने आयातदारांना नवीन करार करण्यास अडथळा येताना दिसत नाही. शेतीमाल बाजार विश्लेषक आणि संशोधक राहुल चौहान म्हणाले, की आयात कालावधी वाढविल्याने आयातदारांची समस्या निकाली निघाली आहे. मात्र सोयापेंडेची आयात वाढल्यास देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढून दरावर काहीसा दबाव येण्याचा शक्यता आहे. मात्र सर्व गणित सोयाबीन बाजारात आल्यानंतर किती उत्पादन, उत्पादकता आणि नुकसान आयातीवर अवलंबून आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com