Agriculture news in Marathi Testing of importers for soybean in many countries | Page 3 ||| Agrowon

सोयापेंडेसाठी आयातदारांची अनेक देशांत चाचपणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 सप्टेंबर 2021

केंद्र सरकारने जनुकीय सुधारित सोयापेंडेच्या आयातीला परवानगी दिल्यापासून आयातदार विविध देशांमध्ये सोयापेंडची चाचपणी करत आहेत. बांगलादेश, व्हिएतनाम आणि अर्जेंटिना या देशांतून सोयापेंड आयातीचे करार झाले आहेत.

पुणे ः केंद्र सरकारने जनुकीय सुधारित सोयापेंडेच्या आयातीला परवानगी दिल्यापासून आयातदार विविध देशांमध्ये सोयापेंडची चाचपणी करत आहेत. बांगलादेश, व्हिएतनाम आणि अर्जेंटिना या देशांतून सोयापेंड आयातीचे करार झाले आहेत. तर इतर देशांमध्ये सोयापेंड उपलब्ध आहे का याची चाचपणी होत आहे. 

केंद्र सरकारने १२ लाख टन जनुकीय सुधारित सोयापेंडेच्या आयातीला परवानगी देत ३१ ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला होता. त्यानंतर नुकतेच सरकारने अधिसूचना काढून ३१ डिसेंबरपर्यंत आयात करार (बिल ऑफ लॅंडिंग) केलेल्या सोयापेंडेची आयात ३१ जानेवारी २०२२ पर्यंत करता येणार आहे. ब्राझील आणि अर्जेंटिनातून आयातीसाठी जास्त कालावधी लागणार होता. परंतु सरकारने आता आयात कालावधी वाढविल्याने येथून आयातीला वेळ मिळेल. आता या देशांतून आयातीसाठी भारतातील आयातदार ३१ ऑक्टोबरपर्यंत करार करत असतील तरी हा माल भारतात वेळेत दाखल होऊ शकतो.

ऑल इंडिया पॉल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनीसुध्दा सरकारच्या निर्णयाचे स्वागतच केले आहे. त्यांचे म्हणणे आहे, की आयातीसाठीचा कालावधी वाढविल्याने पोल्ट्री उद्योगाला दिलासा मिळेल. जनुकीय सुधारित सोयापेंडचा दर कमी असल्याने कमी दरात पोल्ट्री उद्योगाला कमी दरात पेंड मिळेल. आयातीसाठी कंटेनर आणि जहाजांच्या टंचाईची समस्या आहेच. त्यातच ब्राझील आणि अर्जेंटिना देशांतून सोयापेंड आयातीसाठी ६५ ते ७० दिवस लागतील, मात्र आयात कालावधी वाढविल्याने ही पेंड वेळेत भारतात दाखल होईल.

आतापर्यंत झालेले करार
भारतीय आयातदारांनी बांगलादेशातील निर्यातदारांकडून १.२५ लाख टन सोयापेंडची खरेदी केली आहे. त्यानुसार देशात २९ ऑगस्टपासून दररोज जवळपास १५ हजार टन आयात होत आहे. तसेच व्हिएतनाममधून ७५ हजार टन आणि अर्जेंटीनामधून २ लाख टन सोयापेंड आयातीचे करार करण्यात आले आहे. ही पेंड ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत देशात पोचण्याची शक्यता आहे.

उत्पादकता, नुकसानीवर दराचे गणित अवलंबून
प्रत्यक्ष आयातीचा कालावधी वाढविल्याने आयातदारांना नवीन करार करण्यास अडथळा येताना दिसत नाही. शेतीमाल बाजार विश्लेषक आणि संशोधक राहुल चौहान म्हणाले, की आयात कालावधी वाढविल्याने आयातदारांची समस्या निकाली निघाली आहे. मात्र सोयापेंडेची आयात वाढल्यास देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढून दरावर काहीसा दबाव येण्याचा शक्यता आहे. मात्र सर्व गणित सोयाबीन बाजारात आल्यानंतर किती उत्पादन, उत्पादकता आणि नुकसान आयातीवर अवलंबून आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...
इथेनॉलनिर्मिती १५० कोटी लिटरच्या पुढे...पुणे ः राज्याची एकूण इथेनॉलनिर्मिती क्षमता येत्या...
‘सिबिल’वर ठरतेय कर्जदाराची पतसोलापूर : रिझर्व्ह बॅंकेच्या निकषांनुसार आता...
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...