विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या तंत्रज्ञानाची चाचपणी

दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते. त्या पार्श्‍वभूमीवर जैव तंत्रज्ञान विभागाने त्यातील जणूक काढून विविध पिकांमध्ये त्याचा वापर करता येतो का? याविषयी चाचपणी सुरू केली आहे. या संशोधनाच्या निष्कर्षानुसार या जीनचा समावेश असलेली पीक खारपाणपट्ट्यात, कमी तसेच जास्त पावसातही तग धरू शकतील, अशी बाब समोर आली आहे.
Testing of technology that can withstand adverse conditions
Testing of technology that can withstand adverse conditions

नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते. त्या पार्श्‍वभूमीवर जैव तंत्रज्ञान विभागाने त्यातील जणूक काढून विविध पिकांमध्ये त्याचा वापर करता येतो का? याविषयी चाचपणी सुरू केली आहे. या संशोधनाच्या निष्कर्षानुसार या जीनचा समावेश असलेली पीक खारपाणपट्ट्यात, कमी तसेच जास्त पावसातही तग धरू शकतील, अशी बाब समोर आली आहे. त्यामुळे या संशोधनाचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. त्यासोबतच पिकाची वाढ देखील निकोप असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत असलेल्या जैवतंत्रज्ञान विभागाचे तज्ज्ञ डॉ. अमोल सोळंके यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.  

दिल्लीत या संदर्भाने सुरू असलेल्या संशोधनाची माहिती देताना ते म्हणाले की, सध्या कमी तर कधी जास्त पावसाचा फटका पिकांना बसतो. त्याचा उत्पादकतेवर परिणाम होत असल्याने विपरीत परिस्थितीत पीक कसे तग धरेल याविषयी संशोधनावर जैव तंत्रज्ञान विभागाने भर दिला आहे. 

डॉ. सोळंके म्हणाले की, देशात उतीसंवर्धीत रोपांना मागणी वाढली असून ही संख्या पाच कोटीवर पोचली आहे. त्यामध्ये ६७ टक्‍के केळी रोपांचा समावेश आहे. डाळिंबाचे भगवा वाण उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये वापरले जाते. बटाटा देखील उत्तीसंवर्धीत करता येतो. खजूर रोपांकरिता देखील हा पर्याय अवलंबिला जात आहे. खजुराचे एक झाड खराब निघाल्यास वीस वर्षाचे नुकसान होते. त्यामुळे उतीसंवर्धीत रोपांचा पर्याय शेतकऱ्यांसाठी पूरक ठरत आहे. जसे पॅरेंटस आहेत त्याचप्रमाणे त्यापासून तयार रोपांपासून देखील त्याच दर्जाचे फळ मिळावे, असा उद्देश उतीसंवर्धीत रोपे तयार करताना असतो. त्याकरिता प्रोटोकॉल्सची पडताळणी होते. त्यामध्ये ते व्हायरस फ्री असावे त्यासोबतच त्यापासून मिळणारे फळे किंवा उत्पादनाचा दर्जा व संख्या चांगली आहे अशा बाबी तपासण्यात येतात. देशात याची पडताळणी करण्याकरिता चार प्रयोगशाळा आहेत. त्यातील भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) परिसरातील प्रयोगशाळा ही संदर्भ प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते. प्रोटोकॉल विकसित करण्याचे काम या ठिकाणी होते. 

देशभरातील उतीसंवर्धीत रोपे तयार करणाऱ्या संस्थांना या प्रयोगशाळांमध्ये आधी तपासणी करून घ्यावी लागते. त्याअंती त्यांना बियाणे प्रमाणीकरणा प्रमाणेच प्रमाणपत्र दिले जाते. त्याआधारे शेतकऱ्यांमध्ये विश्‍वास निर्माण करणे शक्‍य होते. पूर्वी उतीसवंर्धीत रोपांमध्ये ९० टक्‍के केळी रोपच विक्री होत होती. बटाटा, ऊस, डाळिंब या उतीसंवर्धीत रोपांना नजीकच्या काळात मागणी वाढल्याने केळी रोपांची विक्री टक्‍केवारी ६७ वर पोचली आहे. पूर्वी ऊस बेणे तयार करण्याची प्रक्रिया किचकट होती. ट्रकभर ऊस आणून त्यापासून बेणे काढले जात होते. त्याच्या दर्जाविषयी देखील साशंकता व्यक्‍त होत होती. त्यासोबतच ही प्रक्रिया वेळकाढू ठरायची. उतीसंवर्धीत रोपांच्या उपलब्धतेमुळे रोप जगतील किंवा नाही याविषयीची भीती दूर करता आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com