agriculture news in marathi textile industry may hit by two lakh crore losses | Agrowon

देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा फटका; उद्योजक, शेतकरी हवालदील

चंद्रकांत जाधव 
रविवार, 29 मार्च 2020

जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक व्यवस्थेत मोठा वाटा असलेल्या वस्त्रोद्योगाला कोरोनामुळे मागील दीड ते दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या अडचणींमुळे सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याच वेळी आता लॉकडाऊनमुळे या उद्योगावर अवलंबून असलेले लाखो कामगार, शेतकरी हवालदील झाले आहेत.

जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक व्यवस्थेत मोठा वाटा असलेल्या वस्त्रोद्योगाला कोरोनामुळे मागील दीड ते दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या अडचणींमुळे सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. याच वेळी आता लॉकडाऊनमुळे या उद्योगावर अवलंबून असलेले लाखो कामगार, शेतकरी हवालदील झाले आहेत.

देशात यंदा जगात सर्वाधिक म्हणजेच ३६० लाख कापूस गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादनाची अपेक्षा आहे. तर किमान पाच हजार कोटी किलोग्रॅम सूत उत्पादनाचा अंदाज आहे. सुमारे ६० ते ६५ लाख गाठींच्या निर्यातीची अपेक्षा होती. कारखाने मंदीमुळे कमी क्षमतेने कार्यरत असतानाच कोरोनाच्या दहशतीमुळे प्रक्रिया थांबली. बाजारात फेब्रुवारीअखेरपर्यंत सुमारे २२० लाख गाठींची आवक झाली आहे. कोरोनामुळे गाठींची निर्यात मागील आठ दिवसांपासून पूर्णतः बंद आहे. फक्त २६ लाख गाठींची निर्यात फेब्रुवारीअखेरपर्यंत झाली. मागील हंगामात फेब्रुवारीअखेर सुमारे ३५ लाख गाठींची निर्यात देशातून बांगालेदश, चीन व आफ्रीकन देशांमध्ये झाली होती.

देशात उत्पादीत होणाऱ्या सुतातील २५ ते २८ टक्के निर्यात अपेक्षित होती. निर्यात होणाऱ्या सुतातील ४० ते ४५ टक्के सुताचा खरेदीदार एकटा चीन आहे. परंतु चीनमधील निर्यात फेब्रुवारीच्या सुरवातीपासूनच ठप्प आहे. तर आता व्हीएतनाम, बांगलादेशातील सूत निर्यात बंद झाली आहे. बांगलादेशात किमान २५ ते २९ लाख गाठींची निर्यात अपेक्षित होती. तेथेही सुमारे १२ ते १३ लाख गाठींची निर्यात झाली असून, तीदेखील मागील आठ दिवसांपासून ठप्प आहे.

गाठींची आयातही मागील दीड ते दोन महिन्यांपासून बंदावस्थेत आहे. वस्त्रोद्योगाला वर्षभरापासून चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धाचा फटकाही बसला आहे. यामुळे मंदीचा सामना यंदाच्या हंगामात सुरवातीपासून करावा लागत होता. अनेक गिरण्या, जिनींग प्रेसिंग कारखाने निम्म्या किंवा ६० ते ७० टक्के क्षमतेने कार्यरत होते. आता कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने हा फटका दोन लाख कोटींपेक्षा अधिक झाला आहे.

कापूस प्रक्रिया उद्योग अडचणीत आल्याने कापसाचा उठावही बंद झाला आहे. देशातील जिनींग प्रेसिंग कारखाने, सूतगिरण्या ठप्प झाल्या आहेत. लॉकडाऊन आणखी असणार आहे. यादरम्यानचा वित्तीय तोटा आणखी वाढेल. उत्पादनात देश मागे राहण्याची शक्‍यताही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारात खंडीचे (३५६ किलो रुई) दर १८ ते २० टक्‍क्‍यांनी कमी झाले. वस्त्रोद्योग अडचणीत येत असतानाच शासकीय कापूस खरेदीदेखील गाठींची उचल बंदावस्थेत असल्याने अडचणीत आली. कारण कापूस, सरकीचा साठा वाढला. गाठी कुठे ठेवायच्या? असा प्रश्‍न शासनासमोर निर्माण झाला. यामुळे खरेदी २९ फेब्रुवारीपासून अपवाद वगळता सर्वत्र बंद झाली. याचा परिणाम देशातील कापूस बाजारातही झाला आहे.

दहा टक्के कापूस शेतकऱ्यांकडे पडून
कापसाची खेडा खरेदी किंवा शिवार खरेदी बंद आहे. शेतकऱ्यांना त्याचे नुकसान सहन करावे लागत आहे. देशात ९० टक्के कापसाची खेडा खरेदी केली जाते. फेब्रुवारीपर्यंत देशभरातील कमाल कापसाची खरेदी शासन व कारखानदारांनी केलेली असली तरी अद्याप सुमारे आठ ते १० टक्के कापूस बाजारात आलेला नाही किंवा हा कापूस शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्याची विक्री न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. आता पुढे त्याची विक्री होईल की नाही? असा प्रश्‍नही आहे. कारण प्रक्रिया उद्योग कमालीचा अडचणीत आला आहे. लॉकडाऊन मागे घेतले तरी उद्योग सावरून किती गतीने सुरू होईल? ही भितीदेखील आहे. 

लॉकडाऊनबाबत प्रश्‍न उपस्थित करता येणार नाही. परंतु व्यापार युद्ध, ठप्प झालेली निर्यात, चीनमधील संकट व आता लॉकडाऊन यामुळे जिनींग प्रेसिंग कारखानदार, सूतगिरण्या, कापड उद्योग हे सर्वच संकटात सापडले आहेत. शेतीनंतर सर्वात मोठा रोजगार या क्षेत्रात आहे. काही मदत करताना या क्षेत्राचा निश्‍चितच विचार सरकारकडून झाला पाहिजे. 
- आर.डी.पाटील, कार्यकारी संचालक,
लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी,
उंटावद-होळ (ता.शहादा, जि.नंदुरबार)


इतर अॅग्रो विशेष
टोळधाडीचा राजस्थानमधील ९० हजार हेक्टरला...जयपूर, राजस्थान  ः राज्यातील २० जिल्ह्यांतील...
यंदा पायी वारी नाही; दशमीला पंढरीत...पुणे : आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी राज्य शासन...
अरबी समुद्रातून मॉन्सूनची पुढे चालपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...