agriculture news in Marathi, textile industry shut down for three days within week, Maharashtra | Agrowon

सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जुलै 2019

चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे नोव्हेंबर २०१८ पासून सूतगिरण्या, यंत्रमाग, हातमागधारक अडचणीत सापडले आहेत. देशातील सूतगिरण्यांचे उत्पादन घटत आहे. वस्त्रोद्योगाला बॅंकांनी वित्तपुरवठा न करण्यासंबंधीचे निर्णय जाहीर केले आहेत. या सगळ्या स्थितीत सूतगिरण्या, वस्त्रोद्योगासाठी स्वतंत्र पॅकेज केंद्राने जाहीर करावे. कारण वस्त्रोद्योग शेतीनंतर देशात रोजगाराचा मोठा स्रोत आहे. 
- दीपकभाई पाटील, अध्यक्ष, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा (जि. नंदुरबार)

जळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प असल्याने देशातील सुमारे १५०० सूतगिरण्या मागील तीन महिन्यांपासून आठवड्यातून दोन ते तीन दिवस बंद करण्याची वेळ आली आहे. उत्पादन कमी करण्याचा एकमेव पर्याय गिरण्यांसमोर असून, सूतगिरण्यांचा वित्तपुरवठा जोखमेचा ठरत असल्याने देशातील सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकांनी सूतगिरण्यांना वित्तपुरवठा करण्यासंबंधी नकारात्मक यादीत टाकले आहे. देशात शेतीनंतर रोजगाराचा सर्वात मोठा स्रोत असलेल्या वस्त्रोद्योगात किंवा सूतगिरण्यांमध्ये आजघडीला आणीबाणीची स्थिती आहे. 

गुजरात व महाराष्ट्रातील पंचतारांकित व उत्तम व्यवस्थापन असलेल्या सूतगिरण्या वगळता सर्वच गिरण्यांसमोर अडचणी आहेत. देशात सुमारे पाच हजार कोटी किलोग्रॅम सुताचे उत्पादन दरवर्षी होते. यातील सुमारे एक हजार कोटी किलो सुताची निर्यात चीन, युरोपात होते. एकूण सूत निर्यातीत चीनमधील निर्यातीचा वाटा ७० टक्के असतो.  

चीनमधील निर्यात अमेरिका व चीनमधील व्यापार युद्धापासून रखडत सुरू आहे. रुईचा तुटवडा वाढल्याने दर ४८ हजार रुपये खंडीपर्यंत (३५६ किलो रुई) पोचले होते. त्याच वेळी सुताचे दर मात्र फारसे वाढले नव्हते. यातच मागील महिनाभरात सुताचे दर प्रतिकिलो १८० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. युरोपमध्ये ऑगस्टमध्ये उन्हाळ्याच्या सुट्या जाहीर केल्या जातात, त्यामुळे कमाल युरोपीयन देशांनी भारतासह इतर देशांमधून सूत आयात बंद केली आहे. 

देशात सुमारे १८६० सूतगिरण्या आहेत. यात कमाल गिरण्या दाक्षिणात्य भागात असून गुजरात, महाराष्ट्रात मिळून ३०० सूतगिरण्या आहेत. सर्व गिरण्यांना मिळून रोज २८ लाख गाठींची (एक गाठ १६३ किलो रुई) आवश्‍यकता सूत निर्मितीसाठी असते. रोज ९२ ते ९३ लाख किलो सूत निर्मितीची क्षमता देशातील गिरण्यांमध्ये आहे. परंतु सुतास उठाव नसल्याने उत्पादन कमी करण्याची वेळ आली. परिणामी रोज २० ते २२ लाख किलो सूत उत्पादन कमी झाले आहे.

उत्तरेकडील सुमारे ७३ लहान खासगी सूत उद्योग मे महिन्यातच बंद झाले आहेत. तर कमाल सूत गिरण्या आठवड्यातून दोन ते तीन दिवस बंद असतात.  
चीन वस्त्रोद्योगात आघाडीवर असून, सुताचे जगात सर्वाधिक म्हणजेच सात हजार कोटी किलोपर्यंतचे उत्पादन तेथे घेतले जाते. परंतु तेथील वस्त्रोद्योग डिसेंबर २०१८ पासून अडचणीत आला. चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे भारत, बांगलादेशातील सूत गिरण्या किंवा वस्त्रोद्योगही संकटात सापडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

चीनमध्ये मोठा फटका
चीनमधील जिझियांग शाओझिंग केकियो ही टेक्‍सटाईल सिटी म्हणून जगात ओळखली जाते. तेथील कमाल कापडाची निर्यात होते. परंतु चीन-अमेरिकेतील व्यापार युद्धामुळे या भागातील एक तृतीयांश कारखाने बंद झाले. व्यापारातील अनिश्‍चिततेमुळे आगाऊ नोंदणी तेथे जवळपास थांबली आहे. अमेरिकेला कापड निर्यात करणाऱ्या उद्योगांनी चीनमध्ये दिवाळखोरी जाहीर केली आहे. २०१९ मध्ये पहिल्या पाच महिन्यांत चीनचे आयात व निर्यात मूल्य १.७९ ट्रिलीयन डॉलर होते. ते मागील वर्षाच्या तुलनेत १.६ टक्‍क्‍यांनी कमी होते. चीनमधून अमेरिकेतील निर्यातीमध्ये वर्षाला ८.४ टक्‍क्‍यांनी घट नोंदविण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली. 

 

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...