खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः मुख्यमंत्री फडणवीस

खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः मुख्यमंत्री फडणवीस
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः मुख्यमंत्री फडणवीस

बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खामगाव येथे वाढीव एमआयडीसीसह टेक्सटाइल पार्क निश्‍चितपणे करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. खामगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महायुतीच्या वतीने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.   फडणवीस म्हणाले की, पाच वर्षांत आम्ही सर्व समस्या निकाली लावल्या असा दावा मी करीत नाही. परंतु पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले. काँग्रेसच्या १५ वर्षांच्या काळात जेवढी कामे झाली, त्याच्या दुप्पट कामे पाच वर्षांत केली. वेगाने कामे करून महाराष्ट्र बदलण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली. देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांना दिली. प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न सुरू असून २०२२ पर्यंत एकही कुटुंब घराशिवाय राहणार नाही.  या वेळी मंचावर गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, खा. प्रतापराव जाधव, राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे, आमदार आकाश फुंडकर यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन अ‍ॅड. रमेश भट्टड व जितेंद्र पुरोहित यांनी केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com