agriculture news in Marathi textile park in jamner To hold Maharashtra | Agrowon

जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 जानेवारी 2020

जळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया होऊन त्याला चांगले दर मिळावेत, यासाठी जामनेर (जि. जळगाव) येथे नियोजीत टेक्स्टाईल पार्क रखडले आहे. या पार्कसाठी आवश्‍यक एक हजार एकर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु पुढील कार्यवाही थंड आहे. 

जळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया होऊन त्याला चांगले दर मिळावेत, यासाठी जामनेर (जि. जळगाव) येथे नियोजीत टेक्स्टाईल पार्क रखडले आहे. या पार्कसाठी आवश्‍यक एक हजार एकर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु पुढील कार्यवाही थंड आहे. 

मागील भाजप-सेनेच्या सरकारमध्ये टेक्स्टाईल पार्कसंबंधी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला. प्रशासनाच्या सहकार्याने यासाठी आवश्‍यक जागा व इतर बाबींबाबत कार्यवाही हाती घेण्यात आली. मागील वर्षी जमीन अधिग्रहण कार्यवाही झाली. शासकीय जागा यासाठी घेण्यात आली आहे. खानदेशात कापूस पीक प्रमुख आहे. त्याची अधिकाधिक खरेदी गुजरातमधील कारखानदार दरवर्षी करतात.

तसेच खानदेशलगत पश्‍चिम विदर्भ, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना या भागातही कापसाचे जोमदार उत्पादन घेतले जाते. या भागातील कापसावर प्रक्रिया होण्यासाठी टेक्स्टाईल पार्क आवश्‍यक होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील खानदेशात टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली होती. परंतु यासंदर्भात पुढे कार्यवाही झाली नाही. आता जामनेरातील टेक्स्टाईल पार्कचा मुद्दाही मागे पडला आहे. 

कुठल्याही हालचाली सुरू नाहीत
टेक्स्टाईल पार्कसाठी बरड किंवा नापीक जमीन घेतली असून, त्यात कापसापासून रुई, धागा व कापड निर्मिती करण्यासंबंधीचा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. परंतु प्रत्यक्षात मूलभूत सुविधा, प्रकल्प उभारणी हाती घेतलेली नाही. सुमारे १०० ते १५० कोटी रुपये किमान निधी या कामासंबंधी आवश्‍यक आहे. परंतु मागील पाच ते सहा महिन्यांपासून प्रशासकीय व शासकीय स्तरावरही या प्रकल्पाबाबत कुठल्याही हालचाली सुरू नाहीत.


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...