ठाकरे, फडणवीस समोरासमोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्षातील नेते मंडळीत तर कलगीतुरा नेहमीच रंगतो.
ठाकरे, फडणवीस समोरासमोर Thackeray, Fadnavis face to face
ठाकरे, फडणवीस समोरासमोर Thackeray, Fadnavis face to face

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्षातील नेते मंडळीत तर कलगीतुरा नेहमीच रंगतो. शुक्रवारी (ता. ३०) कोल्हापुरात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस काही वेळासाठी समोरासमोर आले आणि ‘ठाकरे-फडणवीस’ एकत्र या बातमीची चर्चा माध्यमांमध्ये रंगली. 

पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याच्या निमित्ताने हा राजकीय योग जुळून आला. कोल्हापुरातील शाहूपुरीत पूरस्थितीची पाहणी करताना ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली. हे दोन्ही नेते शुक्रवारी जिल्ह्यातील विविध भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री ठाकरे सकाळी शिरोळ भागाचा दौरा करून कोल्हापुरात आले. तर फडणवीस आंबेवाडी, चिखलीचा दौरा करून कोल्हापुरात दाखल झाले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेते होते. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते. तर फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर व अन्य नेते मंडळी होती. दरम्यान, शाहूपुरीत दाखल होताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी, मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून फडणवीस यांना निरोप पाठविला. ‘दोघांनी स्वतंत्र पाहणी करण्यापेक्षा एकत्र पूरस्थितीची पाहणी करू ’ असा निरोप फडणवीस यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते आमने-सामने आल्यामुळे शाहूपुरी परिसरात एकच गर्दी उसळली होती. 

प्रतिक्रिया पूरस्थितीवरून राजकारण करायचे नाही. पूरग्रस्तांच्या पुनर्वसन, उपाययोजनेसंबंधी विरोधी पक्षाच्या सूचनांचा विचार करू.  - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

शाहूपुरी येथे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत काहीवेळ भेट झाली. यामध्ये पूरस्थिती आणि उपाययोजनेसंबंधी चर्चा झाली. पूरग्रस्तांना तत्काळ मदत मिळायला हवी. शिवाय पूर नियंत्रण व स्थितीसंबंधी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत. त्यासंबंधी संयुक्त बैठक बोलवा, असे सुचविले आहे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com