Agriculture news in marathi Thackeray, Fadnavis face to face | Page 2 ||| Agrowon

ठाकरे, फडणवीस समोरासमोर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 जुलै 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्षातील नेते मंडळीत तर कलगीतुरा नेहमीच रंगतो.

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्षातील नेते मंडळीत तर कलगीतुरा नेहमीच रंगतो. शुक्रवारी (ता. ३०) कोल्हापुरात मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधी पक्षनेते फडणवीस काही वेळासाठी समोरासमोर आले आणि ‘ठाकरे-फडणवीस’ एकत्र या बातमीची चर्चा माध्यमांमध्ये रंगली. 

पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याच्या निमित्ताने हा राजकीय योग जुळून आला. कोल्हापुरातील शाहूपुरीत पूरस्थितीची पाहणी करताना ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली. हे दोन्ही नेते शुक्रवारी जिल्ह्यातील विविध भागातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे सकाळी शिरोळ भागाचा दौरा करून कोल्हापुरात आले. तर फडणवीस आंबेवाडी, चिखलीचा दौरा करून कोल्हापुरात दाखल झाले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे नेते होते. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील आदी उपस्थित होते. तर फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर व अन्य नेते मंडळी होती.
दरम्यान, शाहूपुरीत दाखल होताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी, मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून फडणवीस यांना निरोप पाठविला. ‘दोघांनी स्वतंत्र पाहणी करण्यापेक्षा एकत्र पूरस्थितीची पाहणी करू ’ असा निरोप फडणवीस यांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते आमने-सामने आल्यामुळे शाहूपुरी परिसरात एकच गर्दी उसळली होती. 

प्रतिक्रिया
पूरस्थितीवरून राजकारण करायचे नाही. पूरग्रस्तांच्या पुनर्वसन, उपाययोजनेसंबंधी विरोधी पक्षाच्या सूचनांचा विचार करू.
 - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

शाहूपुरी येथे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत काहीवेळ भेट झाली. यामध्ये पूरस्थिती आणि उपाययोजनेसंबंधी चर्चा झाली. पूरग्रस्तांना तत्काळ मदत मिळायला हवी. शिवाय पूर नियंत्रण व स्थितीसंबंधी दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत. त्यासंबंधी संयुक्त बैठक बोलवा, असे सुचविले आहे.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

 


इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...