Agriculture news in marathi Thackeray government to flood victims Help immediately: Fadnavis | Page 2 ||| Agrowon

पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत द्यावी : फडणवीस

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 जुलै 2021

सध्याची पूरस्थिती बिकट आहे, पूरग्रस्तांना तातडीच्या मदत गरजेची आहे. शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे, पूरग्रस्तांना तातडीच्या मदत गरजेची आहे. शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

शुक्रवारी (ता. ३०) त्यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.फडणवीस म्हणाले, ‘‘पूरग्रस्तांना पाणी उतरल्यानंतर संसार सावरण्यासाठी तातडीने मदत गरजेची असते, ती मिळायला हवी. २०१९ला जशी मदत मिळाली तशी मिळावी मदत मिळण्याची पूरग्रस्तांची मागणी आहे. केंद्राने मदत दिली मात्र, राज्य सरकारने अद्याप मदत जाहीर केली नाही. आमची सत्ता असताना आम्ही जागतिक बँकेशी संपर्क साधून दुष्काळी भागाला पाणी देण्याबाबत चर्चा केली होती. अशा दीर्घकालीन योजना झाल्यास दुहेरी फायदा होईल.

पूरग्रस्त भागात नवीन बांधकाम होऊ नयेत, केंद्राकडून मदतीसाठी प्रक्रिया असते, एनडीआरएफचे नियम पाळावे लागतात, व्यापाऱ्यांना सवलतीत कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, त्यावर सबसिडी देता येते का? याचा राज्य सरकारने विचार करावा. शेतकऱ्यांबरोबर गणेश मूर्तीकारांचे मोठे नुकसान झाले आहे, राज्य सरकारने त्यांना भरपाई द्यावी. तातडीची मदत आणि कायमस्वरूपी उपाय या बाबत मुख्यमंत्र्यांशी  चर्चा करणार आहे.’’
 


इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...