शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार असक्षम ः दरेकर

उद्धव ठाकरे सत्तेवर असताना शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सक्षम नाहीत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार असक्षम ः दरेकर
शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत ठाकरे सरकार असक्षम ः दरेकर

नांदेड : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कोरडवाहू जमिनीसाठी २५ हजार व बागायती जमिनीसाठी ५० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली होती. आज ते सत्तेवर असताना शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सक्षम नाहीत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ ते रविवारी (ता. २९) नांदेडात आले होते. यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, संतुक हंबर्डे, प्रवीण साले उपस्थित होते.  पुढे दरेकर म्हणाले, राज्यात असलेले महाविकास आघाडीचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सरकारची वर्षपूर्ती झाली पण वचनपूर्ती झाली नाही. काही झाले की, केंद्राकडे बोट दाखवायचे व आपले अपयश झाकून ठेवायचे ही या सरकारची नीती आहे. या सरकारचे काम नाचता येईना अंगण वाकडे अशा स्थितीचे असल्याचा आरोप श्री. प्रवीण दरेकर यांनी केला. शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या महाविकास आघाडी सरकारने भारतीय जनता पक्षाच्या दबावानंतर १० हजार कोटी रुपयांची मदत देण्याचे घोषित केले. परंतु शेतकऱ्‍यांच्या खात्यावर आजपर्यंत एक रुपयाही गेला नसल्याचे ते म्हणाले.  मराठवाड्यातील विकास कामांना स्थगिती महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यापासून मराठवाड्याच्या विविध विकासकामांना स्थगिती दिली आहे. तीन पक्षांचे हे सरकार एकवाक्यता व समन्वय नसलेले सरकार आहे. हे सरकार अपयश झटकण्यासाठी विषयांतर करत आहेत. या सरकारच्या माध्यमातून सुडाच्या कारवाया होताना दिसत आहेत. राज्यात वर्षभरात कोणतेही काम झालेले नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्यात सरकारमधील मंत्री गुंतले आहेत. जनता विकासापासून कोसो दूर झाली आहे. काही दिवसांतच हे सरकार अंतर्गत विरोधाने पडेल, असेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com