खातेवाटप जाहीर; भुसेंकडे कृषी, केदार 'पशूसंवर्धन', मुश्रीफ ग्रामविकास मंत्री

खातेवाटप जाहीर; भुसेंकडे कृषी, केदार 'पशूसंवर्धन', मुश्रीफ ग्रामविकास मंत्री
खातेवाटप जाहीर; भुसेंकडे कृषी, केदार 'पशूसंवर्धन', मुश्रीफ ग्रामविकास मंत्री

मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकासआघाडी सरकारच्या खातेवाटपाचा तिढा अखेर शनिवारी (ता.४) सहाव्या दिवशी रात्री उशिरा  सुटला आहे. सरकारचे खातेवाटप निश्चित झाले असून लवकरच याची अधिकृत घोषणा होणार आहे. त्याआधी खातेवाटपाची संपूर्ण यादी समोर आली आहे. ठाकरे सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री दादा भुसे कृषी, सुनील केदार पशूसंवर्धन, तर हसन मुश्रीफ ग्रामविकास खाते सांभाळणार आहेत.

शिवसेनेने आपल्याकडील महत्त्वाच्या नेत्यांना महत्त्वाची खाती दिली आहेत. पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार खाते देण्यात येणार आहे. तर सेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आधी गृह खाते होते, आता त्यांच्याकडे नगरविकास आणि एमएसआरडीसी ही दोन खाती देण्यात आली आहेत. तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग खाते कायम ठेवण्यात आले आहे. तसेच शंकरराव गडाख यांच्याकडे जलसंधारण आणि संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी, फलोत्पादन खाते सोपवण्यात आले आहे. राजीनाम्याचा इशारा देणारे राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या अर्थात अर्थ खाते सोपवण्यात आले आहे. जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा खाते सोपवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अनिल देशमुख यांच्याकडे गृह खाते सोपवण्यात आले आहे. अनिल देशमुख यांच्याकडे गृहखाते सोपवून सर्वांना धक्का दिला आहे. तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खाते सोपवण्यात आले आहे.

तर काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते सोपवण्यात आले आहे. तर नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा खाते सोपवण्यात आले आहे.  वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण आणि अमित देशमुख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक विभाग देण्यात आले आहे.

असे आहे ठाकरे सरकारचे खातेवाटप.. शिवसेनेकडील खाती..

  1. उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन व कायदा-सुव्यवस्था
  2. एकनाथ शिंदे - नगरविकास, एमएसआरडीसी
  3. सुभाष देसाई - उद्योगमंत्री
  4. संजय राठोड - वनमंत्री
  5. शंकरराव गडाख - जलसंधारण
  6. अनिल परब - परिवहन, संसदीय कार्य
  7. उदय सामंत - उच्च व तंत्रशिक्षण
  8. आदित्य ठाकरे - पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार
  9. दादा भुसे - कृषी मंत्रालय
  10. संदीपान भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादन

राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री

  1. अजित पवार - उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री
  2. अनिल देशमुख - गृहमंत्री
  3. जयंत पाटील - जलसंपदा मंत्री
  4. छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा
  5. दिलीप वळसे पाटील - उत्पादन शुल्क
  6. धनंजय मुंडे - सामाजिक न्यायमंत्री
  7. नवाब मलिक - अल्पसंख्याक मंत्री
  8. बाळासाहेब पाटील - सहकारमंत्री
  9. जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण मंत्री
  10. हसन मुश्रीफ - ग्रामविकास मंत्री
  11. राजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य

कॉंग्रेसचे कॅबिनेट मंत्री

  1. बाळासाहेब थोरात - महसूलमंत्री
  2. अशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम
  3. नितीन राऊत - ऊर्जामंत्री
  4. वर्षा गायकवाड - शालेय शिक्षणमंत्री
  5. के.सी. पाडवी - आदिवासी विकासमंत्री
  6. अमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
  7. विजय वडेट्टीवार - मदत व पुनर्वसन, खार जमीन
  8. यशोमती ठाकूर - महिला व बालविकास मंत्री
  9. अस्लम शेख - बंदर विकास, वस्त्रोद्योग, मत्स्य संवर्धन
  10. सुनील केदार - दुग्धविकास आणि पशुसंवर्धन

राज्यमंत्री

  • शंभुराजे देसाई - गृहराज्यमंत्री (ग्रामीण), अर्थ, वाणिज्य
  • सतेज पाटील - गृहराज्यमंत्री (शहर)
  • बच्चू कडू - जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार राज्यमंत्री
  • राजेंद्र येड्रावकर - आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, सांस्कृतिक राज्यमंत्री
  • दत्तात्रय भरणे - जलसंधारण राज्यमंत्री
  • अदिती तटकरे - उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री
  • संजय बनसोडे - पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
  • प्राजक्त तनपुरे - नगरविकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री
  • विश्वजीत कदम - कृषी आणि सहकार राज्यमंत्री
  • अब्दुल सत्तार - महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com