Agriculture news in marathi Thailand's challenge to Indian sugar | Page 3 ||| Agrowon

भारतीय साखरेला थायलंडचे आव्हान

राजकुमार चौगुले
गुरुवार, 15 जुलै 2021

येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी भारतास थायलंडशी स्पर्धा करावी लागणार आहे. यंदा (२०२१-२२) थायलंडमध्ये मागील हंगामापेक्षा २५ ते ३० लाख टन जादा साखर उत्पादन  होण्याचा अंदाज आहे. यामुळे भारतीय साखरेला मागणी कमी राहण्याची शक्यता आहे.  

कोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी भारतास थायलंडशी स्पर्धा करावी लागणार आहे. यंदा (२०२१-२२) थायलंडमध्ये मागील हंगामापेक्षा २५ ते ३० लाख टन जादा साखर उत्पादन  होण्याचा अंदाज आहे. यामुळे भारतीय साखरेला मागणी कमी राहण्याची शक्यता आहे.  

इंटरनॅशनल शुगर ऑर्गनायझेशनने (आयएसओ) आपल्या अहवालात म्हटले आहे, जागतिक बाजारात साखर हंगाम २१-२२मध्ये साखरेची तूट २७ लाख टन राहू शकते (पूर्वीचा अंदाज ३१ लाख टन होता). या वर्षी २१-२२ या हंगामामध्ये थायलंडमध्ये मागील हंगामापेक्षा २५ ते ३० लाख टन साखर उत्पादन जादा होण्याचा अंदाज असल्यामुळे भारतीय साखर निर्यात करताना भविष्यात थायलंड, या देशाशी स्पर्धा करावी लागणार आहे. थायलंडमध्ये २०-२१ मध्ये ७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. येत्या हंगामात १०० लाख टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे.

निर्यातदार सूत्रांच्या माहितीनुसार भारताची हक्काची बाजारपेठ असलेल्या श्रीलंका व अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये मागील एक महिन्यापासून साखरनिर्यात थांबलेली आहे. जागतिक बाजारात रिफाइन साखरेची दरवाढ झाल्यानंतर सुद्धा अफगाणिस्तान व श्रीलंका या दोन देशांमध्ये साखर निर्यात थांबल्यामुळे भारत याचा फायदा घेऊ शकत नाही. गेल्या वर्षी भारतीय निर्यातीला इंडोनेशियेला निर्यात केल्याने देशातील साखर विक्रीला हातभार मिळाला.

भारतीय साखर कारखाने मोठ्या प्रमाणात साखर निर्यात करू शकले. साखरेचा मोठा आयातदार देश इराण येथेही भारतातून होणारी निर्यात मागील दोन वर्षांपासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे भारतीय कारखानदारांना हंगाम २१-२२ मध्ये साखर निर्यात करताना जागतिक बाजारातील थायलंडसारख्या देशाबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. साखर कारखान्यांनी पुढील हंगामाच्या साखरनिर्यातीचा आतापासूनच विचार करणे गरजेचे असल्याचे निर्यतदार सूत्रांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सद्यःस्थिती
सोमवारी (ता.१२) युनिकाने (ब्राझील शुगर केन इंडस्ट्री आसोसिएशन) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ब्राझील सेंटर साउथमध्ये जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये साखरेच्या उत्पादनात मागील वर्षापेक्षा ५.६ टक्के जास्त उत्पादन झाले. ब्राझीलच्या चलनामध्ये झालेल्या घटीमुळे जागतिक बाजारामध्ये साखरेचे दर न्यूयॉर्क शुगर मार्केटमध्ये जूनच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यात नीचांकी पातळीवर आले. लंडन शुगर मार्केटमध्येही हीच स्थिती राहिली. मेच्या शेवटच्या आठवड्यापासून १५ जूनपर्यंत पांढऱ्या साखरेचे दर सरासरी ४६० डॉलर प्रति टन तर कच्या साखरेचे दर १९ सेंटपर्यंत वाढले होते. १५ जूननंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कच्या साखरेच्या दरात २ सेंट प्रति पाउंडने पांढऱ्या साखरेच्या दरात ४० डॉलर प्रति टनने घट झाली होती.

मंगळवारपासून (ता. १३) क्रूड तेलात झालेल्या दरवाढीमुळे साखरेचे ही दर वाढत असल्याची माहिती निर्यातदार सूत्रांनी दिली. सध्या कच्या साखरेचे दर १७.६३ सेंट तर पांढऱ्या साखरेचे दर ४२४ डॉलर प्रति टन इतके आहेत.

प्रतिक्रिया
जागतिक बाजारातील दरामध्ये होणारी चढ-उतार तसेच श्रीलंका अफगाणिस्तान, या दोन देशांमध्ये होणारी निर्यात थांबल्यामुळे सध्या हंगाम २०-२१च्या साखरेला निर्यातीकरिता मागणी नाही. जागतिक बाजारातील कंटेनर भाडे व जहाजांच्या वाहतूक दरांमध्ये झालेल्या भाडेवाढीचा तसेच देशांतर्गत ट्रक भाडेवाढीचा साखरनिर्यातीच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार


इतर अॅग्रोमनी
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर...पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा...
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबूनमुंबई : देशात यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली...
साखरदराचा वारू चौखूर उधळला; ३५०० चा...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक...
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे...पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
ब्राझीलला दणका; भारतीय साखर उद्योगास...जगात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे...
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा...जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘...
साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत...
कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय...
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...
जागतिक बाजारात साखर दरात घटकोल्हापूर : जगातील सर्वांत जास्त साखर उत्पादन...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
मोहरीतील तेजीची कारणे  वेगळीच ः विजय...नागपूर : बाजारात हमीभावापेक्षा मोहरीला जास्त दर...
प्रक्रियायुक्‍त खाद्यपदार्थांच्या...नवी दिल्ली : कोरोनाकाळात सर्वच क्षेत्रांना मोठ्या...