गौरखेडा शिवारात २० क्विंटल केळीची चोरी

गौरखेडा शिवारात २० क्विंटल केळीची चोरी
गौरखेडा शिवारात २० क्विंटल केळीची चोरी

चिनावल, जि. जळगाव : येथून जवळच असलेल्या गौरखेडा (ता. रावेर) शिवारात केळीच्या बागेत चोरट्यांनी १२५ केळीचे घड कापून असा २२ क्विंटल माल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) रात्रीच्या सुमारास घडली, तर काही घड शेतातच फेकून चोरट्यांनी पलायन केले.

गौरखेडा (ता. रावेर) शिवारातील शेख इरफान हाजी कुतुबुद्दीन यांच्या केळीबागेतून रात्रीच्यावेळी सुमारे शंभर ते सव्वाशे केळी घड कापून चोरून नेत चोरट्यांनी डल्ला मारला आहे. यामुळे शेतकऱ्याचे ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. 

चोरीच्या घटनेची शेख इरफान यांनी सावदा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, चिनावल, गौरखेडा, वडगाव, वाघोदा या शिवारात नेहमीच केळी घडाची मोठ्या प्रमाणात चोरी होते. 

चोरलेली केळी परिसरातील काही व्यक्ती रेल्वेद्वारे मुंबईकडे घेऊन जातात. या प्रकाराला परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रासले असून, पोलिस प्रशासन तसेच रेल्वे प्रशासनाने या प्रकारावर लक्ष ठेवून, यास आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com