ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
ताज्या घडामोडी
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरी
नाशिक : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील शेतकरी गोरख कचवे या शेतकऱ्याने दहा वर्षांपूर्वी अवर्षण व दुष्काळाचा सामना करत आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार स्वेता जातीच्या ३०० चंदनाच्या रोपांची लागवड केली होती. सध्या ही झाडे तोडणीयोग्य झाल्याने श्री. कचवे यांनी चंदनाची झाडे तोडून विक्रीचा परवाना मिळावा यासाठी वन विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र, चंदन तस्करांनी त्यांच्या शेतातील दोन लाख रुपये किमतीची चंदनाची चार झाडे तोडली आणि दोन फुटांचे तुकडे करून पोबारा केला.
नाशिक : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील शेतकरी गोरख कचवे या शेतकऱ्याने दहा वर्षांपूर्वी अवर्षण व दुष्काळाचा सामना करत आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार स्वेता जातीच्या ३०० चंदनाच्या रोपांची लागवड केली होती. सध्या ही झाडे तोडणीयोग्य झाल्याने श्री. कचवे यांनी चंदनाची झाडे तोडून विक्रीचा परवाना मिळावा यासाठी वन विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र, चंदन तस्करांनी त्यांच्या शेतातील दोन लाख रुपये किमतीची चंदनाची चार झाडे तोडली आणि दोन फुटांचे तुकडे करून पोबारा केला. याबाबत वनविभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर कचवे हे सटाणा पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केळ्याचे श्री. कचवे यांचे म्हणणे आहे.
बागलाण तालुक्यात चंदन तस्करांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी देखील चंदन तस्करांच्या टोळीने श्री.कचवे यांच्या शेतातून एक फूट व्यासाचे चंदनाचे झाड कापून नेले होते. त्या वेळी त्यांनी सटाणा पोलीस ठाणे आणि वनविभागाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, चंदन तस्करांचा शोध घेण्यास तपास यंत्रणेला अपयश आले होते. पोलीस आणि वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन चंदन तस्करांना जेरबंद करावे तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील चोरीस गेलेल्या झाडांचा पंचनामा करून त्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बागलाण तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे, सदस्य कुबेर जाधव, गोरख कचवे रमेश अहिरे, कडू पाटील आदींनी दिला आहे.
- 1 of 1026
- ››