Agriculture news in marathi; Theft of sandalwood from fields in Baglan taluka | Agrowon

बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील शेतकरी गोरख कचवे या शेतकऱ्याने दहा वर्षांपूर्वी अवर्षण व दुष्काळाचा सामना करत आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार स्वेता जातीच्या ३०० चंदनाच्या रोपांची लागवड केली होती. सध्या ही झाडे तोडणीयोग्य झाल्याने श्री. कचवे यांनी चंदनाची झाडे तोडून विक्रीचा परवाना मिळावा यासाठी वन विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र, चंदन तस्करांनी त्यांच्या शेतातील दोन लाख रुपये किमतीची चंदनाची चार झाडे तोडली आणि दोन फुटांचे तुकडे करून पोबारा केला.

नाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील शेतकरी गोरख कचवे या शेतकऱ्याने दहा वर्षांपूर्वी अवर्षण व दुष्काळाचा सामना करत आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये वन विभागाच्या मार्गदर्शनानुसार स्वेता जातीच्या ३०० चंदनाच्या रोपांची लागवड केली होती. सध्या ही झाडे तोडणीयोग्य झाल्याने श्री. कचवे यांनी चंदनाची झाडे तोडून विक्रीचा परवाना मिळावा यासाठी वन विभागाकडे परवानगी मागितली होती. मात्र, चंदन तस्करांनी त्यांच्या शेतातील दोन लाख रुपये किमतीची चंदनाची चार झाडे तोडली आणि दोन फुटांचे तुकडे करून पोबारा केला. याबाबत वनविभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर कचवे हे सटाणा पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केळ्याचे श्री. कचवे यांचे म्हणणे आहे.

बागलाण तालुक्यात चंदन तस्करांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
दरम्यान, गेल्या वर्षी देखील चंदन तस्करांच्या टोळीने श्री.कचवे यांच्या शेतातून एक फूट व्यासाचे चंदनाचे झाड कापून नेले होते. त्या वेळी त्यांनी सटाणा पोलीस ठाणे आणि वनविभागाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, चंदन तस्करांचा शोध घेण्यास तपास यंत्रणेला अपयश आले होते. पोलीस आणि वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन चंदन तस्करांना जेरबंद करावे तसेच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतातील चोरीस गेलेल्या झाडांचा पंचनामा करून त्यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बागलाण तालुकाध्यक्ष सुभाष अहिरे, सदस्य कुबेर जाधव, गोरख कचवे रमेश अहिरे, कडू पाटील आदींनी दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
बॅंकांनी रोखली गटशेतीची वाट :...नागपूर  ः गटशेती योजनेचे अनुदान ६०...
हवामान बदल सहनशील वाण संशोधनाला मिळणार...परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन...
ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयदिनी...मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत...
अल्पसंख्यांक समाजामुळे सत्ता परिवर्तन ः...मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकीत मुस्लिम...
शंकरराव चव्हाण यांच्या...नांदेड ः नांदेडचे नगराध्यक्ष ते...
रुंद वरंबा सरी पद्धती भुईमुगासाठी आहे...भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या तिसऱ्या व चौथ्या...
लागवड हेलिकोनियाची...हेलिकोनियाची लागवड वर्षभर केव्हाही करता येते....
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
..हे आहेत सुपीकता, उत्पादकतेवर परिणाम...पिके मोठ्या प्रमाणावर जमिनीमधून नत्र आणि पालाश...
सुधारित पद्धतीने खोडवा उसाचे व्यवस्थापन खोडवा उसाची योग्य जोपासना केल्यास लागवडीएवढेच...
राज्यात तूर ४१०० ते ५५०० रुपये...नांदेडमध्ये प्रतिक्विंटल४५५० ते ४७०० रुपये...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
वाकुर्डे योजनेसाठी ७०० कोटींची गरजसांगली : शिराळा व वाळवा तालुक्यासाठी वरदान ठरणारी...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
खरीप पीकविम्यापासून शेतकरी वंचितजळगाव  ः खरिपात पिकांचे अतिपावसाने अतोनात...
‘सन्मान निधी’च्या लाभासाठी ‘आधार लिंक’...अकोला  ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या...
रत्नागिरी जिल्ह्यात नियोजनाचा आराखडा...रत्नागिरी ः जिल्हा नियोजन समितीचा आराखडा २०१...
नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील चार...नांदेड : इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प,...
काळवंडलेल्या ज्वारीची हमीभावाने खरेदी...अमरावती  ः जिल्ह्यात पावसामुळे काळवंडलेल्या...
नाशिक येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष...नाशिक  : नाशिक विभागातील सर्वसामान्य जनेतेचे...