agriculture news in marathi, Their should be less interest on loan for Sugar factories : commissioner | Agrowon

साखर कारखान्यांवर जादा व्याज नको : साखर आयुक्त
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जुलै 2019

पुणे : ‘‘राज्यातील साखर कारखान्यांना कर्ज देताना बॅंकांकडून जादा व्याज आकारले जात आहे. मुळात कर्जापोटी कारखाने आपली साखर तारण ठेवतात. कारखान्यांचा कर्जपुरवठा सुरक्षित असूनही व्याजदर जादा ठेवणे सयुक्तिक नाही. बॅंकांनी या धोरणाचा फेरविचार करावा,” असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. 

पुणे : ‘‘राज्यातील साखर कारखान्यांना कर्ज देताना बॅंकांकडून जादा व्याज आकारले जात आहे. मुळात कर्जापोटी कारखाने आपली साखर तारण ठेवतात. कारखान्यांचा कर्जपुरवठा सुरक्षित असूनही व्याजदर जादा ठेवणे सयुक्तिक नाही. बॅंकांनी या धोरणाचा फेरविचार करावा,” असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. 

राज्य सहकारी बॅंकेने आयोजित केलेल्या तीनदिवसीय साखर परिषदेच्या निमित्ताने शुक्रवारी (ता.५) आयोजित केलेल्या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. सहकार आयुक्त सतीश सोनी, राज्य बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मंडळ सदस्य अविनाश महागावकर व संजय भेडे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, व्यवस्थापकीय संचालक अजित देशपांडे, पुणे मध्यवर्ती बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापसिंह चव्हाण या वेळी उपस्थित होते. 

“साखर कारखान्यांनी आतापर्यंत चालू हंगामातील ९७ टक्के एफआरपी वाटली आहे,” असे स्पष्ट करीत साखर आयुक्त म्हणाले की, आगामी हंगामात मात्र ऊस उत्पादन घटू शकते. त्यामुळे काही कारखाने सुरूदेखील होणार नाहीत. अशा स्थितीत कारखानदारीसाठी हा हंगाम एक ‘टर्निंग पॉइंट’ ठरू शकतो.”
सहकार आयुक्त श्री. सोनी म्हणाले, “राज्य बॅंकेच्या एकूण कर्जपुरवठ्यात ग्राहक म्हणून ५० टक्क्यांहून अधिक वाटा साखर कारखान्यांचा आहे. त्यामुळे कारखान्यांच्या बळकटीकरणासाठी बँकेने परिषद आयोजित करण्याचा निर्णय स्तुत्य ठरतो.”

कारखानदारी मजबूत करण्यासाठी बॅंक व कारखाने एकत्र आले पाहिजेत, असा आग्रह धरत श्री.अनास्कर यांनी ‘एनपीए’च्या समस्यांबाबत आपली मते स्पष्टपणे मांडली. “कर्जदारांची मालमत्ता विकून एनपीएची वसुली करणे हे बॅंकेच्या मूळ तत्त्वांशी विसंगत आहे. खरे तर कर्जदाराची परतफेडीची क्षमता वाढवून कर्जवसुली करण्याचा प्रयत्न होण्याची गरज आहे. तोच धागा पकडून आमचे कर्जदार असलेल्या कारखान्यांना सक्षम होण्यासाठी साखर परिषदेचे आयोजन केले आहे,” असे ते म्हणाले. 

प्रदर्शनात मिळते प्रक्रिया प्रकल्पांची माहिती 
साखर उद्योगातील विविध प्रक्रियांसाठी बाजारात उपलब्ध असलेली यंत्रसामग्री व आधुनिक प्रणालीची माहिती देण्याचा प्रयत्न प्रदर्शनातून केला गेला आहे. प्रदर्शनात इथेनॉल व अल्कोहोल उत्पादन प्रकल्प; तसेच साखर कारखाना उभारणीपासून ते ऊस तोडणीसाठी अत्यावश्यक असलेली यंत्रे मांडण्यात आली आहेत.  

इतर अॅग्रो विशेष
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...