agriculture news in marathi then ‘Swabhimani’ will take a violent turn | Agrowon

...तर ‘स्वाभिमानी’ हिंसक वळण घेईल

टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 मार्च 2021

नाशिक : विजेअभावी पाणी देता येत नसल्याने पिके जळत आहेत. सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हिंसक वळण घेईल, असा इशारा सरकारला देण्यात आला.

नाशिक : कोरोना,अतिवृष्टी अन अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. दरम्यान वाढीव वीजबिले पाठवली. भांडवल नसल्याने सध्या शेतकरी ती भरू शकत नाही. सरकार मात्र बील वसुलीसाठी थेट वीज जोडण्या खंडित करत आहे. विजेअभावी पाणी देता येत नसल्याने पिके जळत आहेत. सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हिंसक वळण घेईल, असा इशारा सरकारला देण्यात आला.

महावितरणकडून सध्या वीज जोडण्या खंडित करण्यात येत असल्याने संघटनेने आक्रमक होत शुक्रवार (ता.१९) चांदोरी (ता.निफाड) येथे रास्ता रोको केला. 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जनतेला कायमस्वरूपी वीजमाफी देऊ शकतात. तर महाराष्ट्र सरकार कोरोना काळातील वीज माफ करून शकत नाही? असा सवाल करण्यात आला. सरकारने मोगलाई व ब्रिटिश राजवटीसारखे जनतेला वेठीस धरू नये. अन्यथा, जनता तुम्हाला घरी पाठवेल. शेतकरी व जनतेचा अंत पाहू नका, अशी रोखठोक भूमिका आंदोलकांनी मांडली

आंदोलनानंतर महावितरणचे सहायक अभियंता विशाल मते, मनोज कातकाडे आदींना निवेदन देण्यात आले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस निवृत्ती गारे, विभागीय जिल्हाध्यक्ष राजू शिरसाट, ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पगार,युवक जिल्हाध्यक्ष परशुराम शिंदे, रवींद्र शेवाळे, निफाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब तास कर, गजानन घोटेकर, राम राजोळे, सचिन कड, शंकर फुगट आदी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...