... then block the milk centers. Beat the movement: Ajit Navale
... then block the milk centers. Beat the movement: Ajit Navale

...तर दूध केंद्रांना टाळे ठोको आंदोलन ः अजित नवले

सात सप्टेंबरपर्यंत दूध दरवाढीबाबत कसलीही हालचाल झाली नाही. तर दूध संघाच्या दूध संकलन केंद्रालाच टाळे ठोकून आंदोलनाचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे नेते डाॅ. अजित नवले यांनी सांगितले.

नगर ः सात सप्टेंबरपर्यंत दूध दरवाढीबाबत कसलीही हालचाल झाली नाही. तर दूध संघाच्या दूध संकलन केंद्रालाच टाळे ठोकून आंदोलनाचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे नेते डाॅ. अजित नवले यांनी सांगितले.

दुधाला आता मागणी वाढत आहे. याशिवाय शासनाने दररोज दहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सहकारी दूध संघाकडून एक सप्टेंबरपासून पंचवीस रुपये लिटरने दूध खरेदी होईल. तसेच मागणी वाढल्याने आठ दिवसांत दुधाचा दर वाढीला चालना मिळणार आहे. तसे संकेत दूध संघाने दिले आहेत. त्यामुळे आठ दिवस दूध दरवाढीबाबत आशा बाळगून आहोत, असेही नवले यांनी सांगितले. 

डाॅ. नवले म्हणाले की, दुधाला मागणी वाढत आहे. शिवाय दहा लाख लिटर दूध दररोज खरेदी करण्याची योजना आणली आहे. त्यामुळे एक सप्टेंबरपासून बहुतांश दूध संघाकडून दूध दरात वाढ होणे अपेक्षित आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे साधारण आठ दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येऊन पंचवीस रुपयाच्या पुढे दुधाचे दर जातील, असे सांगितले जात आहे. सरकार, दूध संघ आश्वासन देत असतील तर आठ दिवस वाट पाहायला हवी असे समजून आम्ही ७ सप्टेंबर पर्यंत वाट पाहात आहोत. दुधाचे दर वाढण्यासाठी सरकार, दूध संघाने काय करावे, हे त्यांनी ठरवावे. मात्र, मागणी वाढली आणि शासनही अतिरिक्त दूध खरेदी करत असेल तर दुधाला दर मिळालाच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. 

राज्यात संकलित होत असलेल्या १ कोटी ३० लाख लिटर दुधांपैकी ७६ टक्के दूध खासगी दूध कंपन्यांकडून संकलित होते. सरकारची दूधखरेदीची योजना केवळ सहकारी दूध संघांनाच लागू असल्याने खासगी कंपन्यांना दूध घालणारे राज्यातील बहुसंख्य शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. योजनेचा लाभ घेतलेल्या सहकारी दूधसंघांनी दूधउत्पादकांना किमान २५ रुपये दर द्यावा, अशी अट आहे. प्रत्यक्षात योजनेचा लाभ घेणारे संघही शेतकऱ्यांना १७ ते २० रुपये दर देत असल्याचे समोर आले आहे. ते आता अजिबात खपवून घेतले जाणार नाही. सहकारी दूध संघांनी पंचवीस रुपये दरानेच १ सप्टेंबरपासून दूध खरेदी करणे अपेक्षित आहे. खासगी दूध सघांनीही मागणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर दूधदर वाढवावे. ७ सप्टेंबर पर्यंत परिस्थिती बदलली नाही तर दूध संकलन केंद्रालाच टाळले ठोकून तीव्र आंदोलन करणार असल्याचे नवले म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com