...तर टँकरचा खर्च ग्रामसेवकाकडून

...तर टँकरचा खर्च ग्रामसेवकाकडून
...तर टँकरचा खर्च ग्रामसेवकाकडून

नाशिक : पाणीटंचाई सुरू असतानाही विंधनविहिरीसाठी प्रपत्र न भरून देणाऱ्या ग्रामसेवकाची चांगलीच कानउघाडणी करत विंधनविहिरीस पाणी लागले तर टँकरसाठी होत असलेला खर्च वसूल करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिला.

नांदगाव पंचायत समितीच्या सभागृहात पाणीटंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार आदी उपस्थित होते. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखड्यात नांदगाव तालुक्यातील १६ योजना प्रस्तावित असून, यापैकी ५ योजनांचे सर्वेक्षण बाकी असल्याचे समोर आले. सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.

टँकर नादुरुस्त असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी या वेळी केली. याबाबत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी तत्काळ टँकर बदलून देण्याची कार्यवाही  करण्याचे आदेश देण्यात आले. गावात टँकर सुरू असतानाही विंधन विहिरीसाठी ग्रामसेवकांनी अद्यापही विहित नमुन्यात माहिती दिलेली नसल्याने डॉ. गिते यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. या गावात विंधनविहिरींना पाणी लागल्यास टँकरसाठी होणारा खर्च वसूल करण्याचा इशारा दिला.

बैठकीस पंचायत समिती सभापती विद्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, पंचायत समिती सदस्य सुभाष कुठे, मधुबाला खिराडकर, तहसीलदार भारती सागरे, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com