Agriculture news in Marathi ... then the damage to the grapes would have been avoided | Page 2 ||| Agrowon

...तर द्राक्षाचे नुकसान टळले असते

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील पूर्वहंगामी द्राक्ष पीक काढणी अवस्थेत असताना मॉन्सूनोत्तर पावसामुळे नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

नाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील पूर्वहंगामी द्राक्ष पीक काढणी अवस्थेत असताना मॉन्सूनोत्तर पावसामुळे नुकसानीच्या भक्ष्यस्थानी सापडत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. काढणीयोग्य द्राक्ष मालाचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी प्लास्टिक आच्छादनासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र, त्याकडे शासकीय दुर्लक्ष झाल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

प्लास्टिक आच्छादनासाठी अनुदानाच्या मागणीचा विचार झाला असता तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले नसते, अशी संतप्त भावना द्राक्ष पट्ट्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कसमादे पट्ट्यात सटाणा, मालेगाव, देवळा व कळवण तालुक्यातील द्राक्ष हंगाम घेतला जातो. जवळपास ३,८०० एकरवर बागा आहेत. त्यापैकी जवळपास ४० टक्के मालाची काढणी होऊन ६० टक्के द्राक्षमाल वेलींवरच होता. त्यास सरासरी ८० ते १०० रुपये किलोप्रमाणे दर मिळत होता. मात्र, मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यात तडे जाण्याची समस्या वाढली आहे. त्यामुळे जवळपास २०० कोटी रुपयांवर नुकसान झाले आहे. 

परिणामी या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. आमचे नुकसान पाहण्यासाठी राजकीय नेते बांधावर येतात. प्रशासनाची यंत्रणा सगळे फार्स करते. मात्र, समस्येवर उपाययोजना सुचवून कार्यवाही करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा संयमाची पातळी संपली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांसह शासकीय यंत्रणेने दौरे केले. मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पदरी काहीच न पडल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आजही पाणी आहे.

प्रतिएकरसाठी ४ लाखखर्च प्रस्तावित 
प्लास्टिक पेपरसाठी एकरी २.५ ते ३ लाख, अँगल व तारा बांधणी यासाठी १ लाख असा प्रतिएकरसाठी ४ लाख खर्च प्रस्तावित आहे. तुलनेत मागणीनुसार शासनाने जर निम्मे ५० टक्के अनुदान दिल्यास मोठी मदत होऊ शकते.त्यासाठी एकरी २ लाख रुपये अनुदान दिल्यास कमसादे भागातील ३ हजार ८०० एकरवरील बागांना ७ कोटी रुपयात पुढील दहा वर्षांसाठी हा प्रश्न सुटला असता. अन्‌ गेल्या तीन वर्षात ५०० कोटींचे नुकसान झाले नसते, असे  शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.
 


इतर अॅग्रो विशेष
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
हवामानशास्त्र विभागाचा अंदाज, पारा...  पुणे - दक्षिण कोकणावर गेल्या तीन...
भारतातून सोयापेंड निर्यात घसरली, जाणून...१) दक्षिण कोकणावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
साखर निर्यात जोरात ?जानेवारी २०२२ अखेरपर्यंत आणखी ७ लाख टन साखरेची...
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
पीकविम्यासाठी रविकांत तुपकरांचे मुंडन...बुलडाणा - जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना रिलायन्स...
रयतू बंधू योजनेकडून ५० हजार कोटींचा...राज्यातील ६६ लाख शेतकऱ्यांपैकी ६४ लाख शेतकऱ्यांना...
शेतीमालावरील वायदेबंदी, जी.एम बंदी हटवापुणे - या वर्षी काही शेतीमालाला चांगले दर मिळू...
कसे वाढतात अल्पभूधारकांवरील कर्जाचे...२०१९ सालच्या ७७ व्या राष्ट्रीय नमुना...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...