कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
बातम्या
...तर खंडणीचे गुन्हे दाखल करा ः गरड
पुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली, तोलाई, वाराईबाबतचे दर ठरवून दिले आहेत. तेवढ्याच दराने आकारणी व्हावी. जास्त दराची आणि अतिरिक्त पैशांची मागणी कोण करत असेल, तर त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करा.’’
पुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली, तोलाई, वाराईबाबतचे दर ठरवून दिले आहेत. तेवढ्याच दराने आकारणी व्हावी. जास्त दराची आणि अतिरिक्त पैशांची मागणी कोण करत असेल, तर त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करा,’’ असे आदेश बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिले.
याबाबतच्या तक्रारी प्रशासनाकडे केल्यास संबधितांचे परवाने रद्द करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. पूना मर्चंट्स चेंबरने केलेल्या विविध मागण्या आणि आरोपांच्या पार्श्वभूमीवर गरड यांनी विविध प्रश्नांवर केलेल्या कार्यवाहीबाबतची माहिती गुरुवारी (ता.२५) पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
गरड म्हणाले,‘‘पूना मर्चंट्स चेंबरने बाजार समितीमधील सुरक्षा, वाहतूककोंडीच्या समस्या मांडल्या होत्या त्यानुसार सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात आली. सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविली. कांदा दरवाढी दरम्यान ११ कांदा चोर आणि २ मोबाईल चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केले. स्वच्छतेच्या बाबतीत दंडात्मक कारवाई सुरु आहे. रंगरंगोटीच्या नावाखाली संपूर्ण आराखडा बदलण्याचे उद्योग काही आडत्यांनी केले होते. त्यांच्यावर कारवाई केली.’’
सेस भरण्यास अडीच महिने मुभा
सेस रोज भरणे कायद्यानुसार अभिप्रेत आहे. मात्र काही अडचणींमुळे विलंब झाल्यास, अडीच महिन्यांपर्यंत मुभा राहील. त्यानंतर १२ टक्के व्याज लागेल. तसा नियम लागू केला आहे. पूर्वी परवाना तीन वर्षांसाठी दिला होता. तो आता एक वर्षासाठी असेल, असे गरड यांनी सांगितले.
‘चेंबर’ची कर्तव्यात कसूर
गूळ भुसार विभागातील रस्त्याचे कंत्राट २०१८ मध्ये देण्यात आले होते. हे काम १२ महिन्यात पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांनी हे काम तीन वर्षांत पूर्ण होऊ शकले नाही. ‘चेंबर’च्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करणे गरजेचे होते. तेव्हा हा विषय गंभीर नव्हता का? आंदोलन करण्याच्या कर्तव्यात ‘चेंबर’च्या पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली, असा टोला गरड यांनी आंदोलकांना लगावला.
- 1 of 1590
- ››