Agriculture news in marathi ... then MSEDCL office will be burnt down: b. Basement | Page 2 ||| Agrowon

...तर महावितरणचे कार्यालय जाळणार :  आ. भुयार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

वरुड, मोर्शी तालुक्यांत महावितरणच्या निष्काळजीपणामुळे वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. याची तत्काळ दखल घेत यावर नियंत्रण न मिळविल्यास अधीक्षक अभियंता कार्यालय जाळण्याचा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला आहे. 

अमरावती :  वरुड, मोर्शी तालुक्यांत महावितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. याची तत्काळ दखल घेत यावर नियंत्रण न मिळविल्यास अधीक्षक अभियंता कार्यालय जाळण्याचा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला आहे. 

मोर्शी वरुड तालुक्यात हलगर्जीपणामुळे १६ केव्हीचे २५ ट्रांसफार्मर, ६३ केव्हीचे २० ट्रांसफार्मर, १०० केव्हीचे ४० ट्रांसफार्मर, असे एकूण ८५ ट्रांसफार्मर नादुरुस्त आहेत. रब्बी हंगामात शेतकरी त्यांच्याकडील संरक्षित सिंचन पर्यायातून पाण्याचा उपसा करतात त्याकरिता त्यांना विजेची गरज भासते. मात्र नादुरुस्त ट्रान्सफार्मरमुळे पिकाला पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

आधी सुद्धा आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड येथे आढावा बैठक घेऊन दोन्ही तालुक्यातील नादुरुस्त ८५ ट्रांसफार्मर व  सिंगल फेज लाईन दुरुस्तीची निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही ट्रांसफार्मर दुरुस्तीबाबत हालचाल झाली नाही. अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे पाहून या संदर्भाने महावितरण अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा इशारा आमदार भुयार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देखील अधिकाऱ्यांकडून करण्याचे संकेत त्यांनी दिले.


इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...
तीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापनतीळ पिकामध्ये तीळ + मूग (३:३), तीळ + सोयाबीन (२:१...
शेतकरी नियोजन पीक - ज्वारीज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत...
तूर विक्रीसाठी ३९८० शेतकऱ्यांची नोंदणीपरभणी ः यंदाच्या खरीप हंगामात (२०२०-२१) आधारभूत...
लातूर येथे बुधवारी जवस पीक प्रात्यक्षिकपरभणी ः लातूर येथील गळीतधान्‍ये संशोधन केंद्र...
कृषी यंत्रणेला तत्पर करणार ः धीरजकुमारऔरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यातील कृषी विस्तार व...
नगरमध्ये कावळे ‘बर्ड फ्लू’ बाधितनगर ः श्रीगोंदा तालक्यातील भानगाव शिवारात मृत...