जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने जनावरांच्या जाती, प्रजाती, आनुवांशिकता, वेत
अॅग्रो विशेष
...तर दूध उत्पादकांना २५ रुपये दर देणे अशक्य
पुणे: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये देण्याबाबत अजूनही दुग्धविकास विभागाकडे हरकती येत आहेत. पिशवीबंद दुध व्यवसायात विक्रीसाठी किमान दर निश्चित न झाल्यास शेतकऱ्यांना शासनाप्रमाणे दर देता येणार नाही, अशी भूमिका दुग्ध व्यावसायिकांनी दुग्धविकास सचिवांसमोर घेतली आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतरदेखील दूध खरेदी व विक्रीमध्ये जाणिवपूर्वक तफावत तयार केली जात आहे. बाजारात हेतुतः कमी दराने दूध विकून संभ्रम तयार केले जात असल्याचे पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यावसायिकांनी आयुक्तांना लेखी कळविले आहे.

‘‘शेतकऱ्यांसाठी खरेदीदर वाढवून देण्याचे आदेश आल्यानंतर वितरकांचे दर वाढविणे व स्किम बंद करण्याबाबत प्लांटचालकांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला होता. मात्र, काही प्लान्टचालक अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी करीत नाहीत. त्यामुळे डेअरी प्रकल्प अडचणीत आलेले आहेत,’’ असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
पावडर व भुकटी प्रकल्पाकडे अतिरिक्त दूध पाठविल्यानंतर या प्लांटचालकांकडून विविध कारणे दिली जातात व कमी भाव दिला जातो. ‘‘प्लांटचालक काहीही कारणे सांगून प्रतिलिटर वीस रुपये भाव गाय दुधाला देत आहेत. त्यामुळे सचिवांनी लक्ष घालून दूध वितरक, एजंट, घाऊक विक्रेते यांच्यासाठी समान दर निश्चित करण्याचे आदेश द्यावेत,’’ अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
‘‘दूध वितरक, एजंट, घाऊक विक्रेते यांच्यासाठी समान दर निश्चित न झाल्यास गाय दुधाला २५ रुपये भाव देता येणार नाही असे आम्ही शासनाला कळविले आहे. आमच्या भूमिकेबाबत अद्याप तरी कोणतीही पावले दुग्धविकास विभागाने टाकलेली नाही,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.
- 1 of 435
- ››