Agriculture news in Marathi ..Then why the farmers' agitation? | Agrowon

..मग शेतकऱ्यांचे आंदोलन कशासाठी? 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021

उत्तरप्रदेशातील हिंसाचाराने अवघा देश ढवळून निघाला असताना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ४) शेतकरी आंदोलनावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

नवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील हिंसाचाराने अवघा देश ढवळून निघाला असताना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ४) शेतकरी आंदोलनावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. कृषी कायद्यांना न्यायालयामध्ये आव्हान दिले असताना देखील शेतकरी आंदोलन कशासाठी करत आहेत? असा सवाल न्यायालयाकडून करण्यात आला. 

केंद्र सरकारनेही लखीमपूरसारख्या घटना पुन्हा घडता कामा नयेत त्यामुळे आणखी आंदोलन होता कामा नये असे नमूद केले. आंदोलनाचा अधिकार हा सर्वस्वी आहे का? यावर आपण २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी घेऊ असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. कृषी कायद्यांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असताना शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची अधिकार आहे का? यावरही न्यायालयात सुनावणी होणार आहे. 

दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका शेतकरी संघटनेने न्यायालयात सादर केली आहे. न्यायालयाकडून त्याची आज दखल घेण्यात आली. आजच्या सुनावणीदरम्यान ॲटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी सांगितले की, लखीमपूरमधील हिंसाचारात आठजण मरण पावले असून अशा प्रकारची आंदोलने होता कामा नयेत. यावर न्यायालयानेही अशा प्रकारची आंदोलने होतात तेव्हा कुणीच जीवित अथवा वित्तहानीची जबाबदारी घेत नाही, असे नमूद केले. 
 


इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...