Agriculture news in Marathi, There is anger due to the increase in sugarcane prices | Agrowon

तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव वाढविल्याने संताप 
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता. पाथर्डी) येथे वाढविल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होत विक्री बंद पाडली. युवा नेते भाऊसाहेब लवांडे यांच्या मध्यस्थीनंतर उसाचे दर कमी केल्यावर पुन्हा विक्री सुरू झाली. 

तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (ता. पाथर्डी) येथे वाढविल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होत विक्री बंद पाडली. युवा नेते भाऊसाहेब लवांडे यांच्या मध्यस्थीनंतर उसाचे दर कमी केल्यावर पुन्हा विक्री सुरू झाली. 

बारामती, लोणंद, आळेफाटा येथून खासगी व्यापारी तिसगाव येथे ऊस चारा विक्रीसाठी आणतात. दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्यासाठी उसाला मोठी मागणी आहे. साधारण साडेतीन हजार रुपये टनाप्रमाणे विकल्या जाणाऱ्या उसाला दोन दिवसांपासून अचानक पाच हजार रुपये सांगितले जाऊ लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आज सकाळी बाजारात जाऊन शेतकऱ्यांनी उसाचे दर कमी करण्याची विनंती केली. मात्र खर्च वाढल्याचे सांगत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होत आंदोलनाची भूमिका घेतली. 

उसाचे भाव कमी होईपर्यंत विक्री होऊ देणार नाही, असा इशारा दिला. भाऊसाहेब लवांडे यांना शेतकऱ्यांनी बोलाविले. व्यापाऱ्यांनी ठरवून दरात मोठी वाढ केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. लवांडे यांनी ऊसविक्रेते व शेतकऱ्यांची भूमिका ऐकून घेत भाव कमी करण्याची सूचना ऊसविक्रेत्यांना केली. त्यानंतरही काही विक्रेते भाव कमी करण्यास तयार नव्हते. त्यामुळे संतप्त शेतकरी व लवांडे यांनी चढ्या भावाने ऊसविक्री करायची असल्यास, तुमची वाहने येथे उभी राहू देणार नाही, तसेच चाराविक्री करू देणार नाही, असा इशारा दिला.

त्यानंतर विक्रेते नरमले. लवांडे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर ३८०० ते ४००० रुपये टनाप्रमाणे विक्री करण्यास तयार झाले. विक्रेत्यांचा तोटा होणार नाही, तसेच शेतकऱ्यांचीही लूट होणार नाही, या पद्धतीने चाऱ्याचे दर ठरविले जावेत, अशी सूचना लवांडे यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...