पुणे जिल्ह्यात लोकसभेसाठी दहा लाख मतदार वाढले

पुणे जिल्ह्यात लोकसभेसाठी दहा लाख मतदार वाढले
पुणे जिल्ह्यात लोकसभेसाठी दहा लाख मतदार वाढले

पुणे : लोकसभा निवडणूक २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यात मतदारांची संख्या १० लाखांनी वाढली आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यात सुमारे साडे ६३ लाख मतदार होते, तर आता मतदार संख्या ७३ लाख ४६ हजारांवर पोचली आहे. यात १८ ते १९ वयोगटातील ५४ हजार मतदारांचा समावेश असून, हे नवमतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. 

पुणे जिल्ह्यात बारामती, पुणे, शिरूर हे पूर्ण मतदारसंघ तर मावळ लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघाचा विचार करता जिल्ह्यात एकूण ७३ लाख ६३ हजार ८१२ एकूण मतदार आहेत. यात ३८ लाख ५१ हजार ४४५ पुरुष, तर ३५ लाख ५१ हजार २२८ महिला, तर १३९ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. महिला मतदारांची संख्या दर हजारी पुरुषांमागे ९१२ आहे. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत १८ ते १९ वयोगटातील ५४ हजार ११५ मतदार पहिल्यांदाच निवडणुकीचा हक्क बजावणार आहे. २०१४ मध्ये या मतदारांची संख्या ६९ हजार २६१ होती. 

विधानसभा मतदारसंघ निहाय नवमतदार : जुन्नर २६११, आंबेगाव ३१८०, खेड आळंदी २५९९, शिरूर ४१९५, दौंड २३४०, इंदापूर ३०६०, बारामती ३६९६, पुरंदर ३९४५, भोर ४४११, मावळ ३७७२, चिंचवड २३४७, पिंपरी १४८२, भोसरी १७९२, वडगाव शेरी २०८२, शिवाजीनगर ११४१, कोथरूड १७०६, खडकवासला २५७७, पर्वती १७८४, हडपसर २७६८, पुणे कॅन्टोन्मेंट १०६०, कसबा पेठ १५६७.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com