सोलापुरात कोरोना रोखण्यासाठी २७ खासगी डॉक्टरांचा सेवा वर्ग

सोलापूर : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काही खासगी डॉक्टरांच्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ( सिव्हील हॉस्पिटल) येथे वर्ग करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. याबाबतचे आदेश त्यांनी जारी केले.
There are 27 private doctor's service classes for preventing coronas in Solapur
There are 27 private doctor's service classes for preventing coronas in Solapur

सोलापूर  : सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काही खासगी डॉक्टरांच्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ( सिव्हील हॉस्पिटल) येथे वर्ग करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. याबाबतचे आदेश त्यांनी जारी केले. 

सिव्हील हॉस्पिटलकडे शहरातील विविध क्षेत्रातील २७ वैद्यकीय व्यवसायिकांची सेवा वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये सात कार्डीओलॉजिस्ट, चार गॅस्ट्रोएंटरलॉजिस्ट, पाच नेफ्रोलॉजिस्ट, सहा न्युरॉलॉजिस्ट आदींचा समावेश आहे. या डॉक्टरनी सिव्हील हॉस्पिटल येथील फिव्हर ओपीडी, मेडिसीन ओपीडी आणि मेल-फिमेल मेडिकल वॉर्ड मध्ये सेवा बजावयाची आहे. 

या सर्व डॉक्टरनी वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या सूचनांनुसार काम पाहायचे आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे सोलापूर अध्यक्ष डॉ. हरिश रायचूर यांना याबाबत समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असे आदेशात शंभरकर यांनी नमूद केले आहे. 

या डॅाक्टरांचा समावेश 

कार्डिओलॉजिस्ट - डॉ. रिझवाज हक, डॉ. गुरुनाथ पारळे, डॉ. अमजद सय्यद, डॉ. शैलेश पाटील, डॉ. अनुपम शहा, डॉ. सत्यशाम तोष्णीवाल, डॉ. राहुल सोमाणी, गॅस्ट्रोएंटरलॉजिस्ट- डॉ. सुजित जहागीरदार, डॉ. सुर्यप्रकाश कोठे, डॉ. तोटला, डॉ. अमोल पाटील, नेफ्रोलॉजिस्ट- डॉ. संदिप होळकर, डॉ. नील रोहित पाईके, डॉ. गजानन पिलगुलवार, डॉ. कोलूर, डॉ. मालू, न्युरॉलॉजिस्ट - डॉ. सचिन बांगर, डॉ. अश्विन वळसंगकर, डॉ. प्रसन्न कासेगावकर, डॉ. अशिष भुतडा, डॉ. आनंद मुदकना, डॉ. पी. एम कुलकर्णी, पुल्मोनोलॉजिस्ट - डॉ. लतिफ शेख, डॉ. फिरोज सय्यद, डॉ. आमले, एंडोक्रीनोलॉजिस्ट - डॉ. पुनम बजाज आणि डॉ. हर्षल काकडे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com