सोलापूर जिल्ह्यातील छावण्यांमध्ये ५९ हजार जनावरे

दुष्काळात मजुरीअभावी जिल्ह्यातून स्थलांतर होऊ नये. जिल्ह्यातील मजुरांना जिल्ह्यातच रोजगार मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे. मागेल त्याला शेततळे, पाणंद रस्ते, नाला सरळीकरण व खोलीकरण ही कामे प्रस्तावित आहेत. गरजूंनी मजुरीची मागणी प्रशासनाकडे करावी. - डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी
सोलापूरजिल्ह्यातील छावण्यांमध्ये ५९ हजार जनावरे
सोलापूरजिल्ह्यातील छावण्यांमध्ये ५९ हजार जनावरे

सोलापूर  : जिल्ह्यातील छावण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत जिल्हा प्रशासनही आता नियमित कामकाजाला लागल्याने दुष्काळ व टंचाई उपाययोजनांवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले आहे. जिल्ह्यात सध्या १०४ छावण्या सुरू असून, या छावण्यांमध्ये ५९ हजार जनावरे जगत आहेत. 

सांगोला आणि मंगळवेढा तालुक्‍यात सर्वाधिक छावण्या आहेत. मे महिन्यात व जूनपर्यंत छावण्यांची मागणी राहील अशी शक्‍यता गृहीत धरण्यात आली आहे. दुष्काळात टॅंकर आणि छावण्यांसोबतच नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन आखण्यात आले आहे. कामे मंजूर आहेत, परंतु कामांची मागणी नाही, अशीच स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे जिल्ह्यातील मजुरांना जिल्ह्यातच रोजगार मिळू लागला आहे. कामाची मजुरी रोहयोच्या तुलनेत अधिक असल्याने या कामांकडे मजुरांचा ओढा आहे. माळशिरस व पंढरपूर तालुक्‍यांतील फळबागांमध्येही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असल्याचेही चित्र आहे. जिल्ह्यात सध्या रोहयोच्या कामावर २ हजार ३८८ मजूर कार्यरत असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com