Agriculture news in marathi There are no intercrops on online Satbara in Sangli | Agrowon

सांगलीत ऑनलाइन सातबाऱ्यावर नाहीत आंतरपिके

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

सांगली ः शासनाने खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी पिकाची नोंद असलेल्या सातबाऱ्याची अट घातली आहे; मात्र मुख्य पिकात आंतरपीक घेतले असल्यास त्याची ऑनलाइन सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी सुविधी नाही.

सांगली ः शासनाने खरेदी केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी पिकाची नोंद असलेल्या सातबाऱ्याची अट घातली आहे; मात्र मुख्य पिकात आंतरपीक घेतले असल्यास त्याची ऑनलाइन सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी सुविधी नाही. त्यामुळे पिकांची नोंद करता येत नाही. केवळ मुख्य पिकांचीच नोंद होत आहे. त्यामुळे सोयाबीन हमीभावाने विकणे कठीण झाले आहे.

शासनाने सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू केली; मात्र पिकांची नोंद असलेला सातबारा असणे आवश्यक असा नियम लागू केला. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जून, जुलै महिन्यात आडसाली उसाची लागवड केली जाते. त्या नंतर सोयाबीनची पेरणी केली जाते आणि सातबाऱ्यावर पिकांची नोंद करण्यास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सुरवात होते.

पिकांची नोंद करण्यासाठी आजही शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जावे लागते आहे. हस्तलिखत सातबारा बंद करण्यात आले आहेत. सर्व सातबारा ऑनलाइन पध्दतीने सुरु केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता ऑनलाइन सातबाऱ्यांवर पिकांची नोंद असेल, तरच हा सातबारा उपयोगी ठरेल. 

ऑनलाइन सातबाऱ्यावर पिकाची नोंद केली जाते. परंतु, या पध्दतीत एक पीक नोंदवले जाऊ शकते. दुबार पीक तसेच मुख्य पिकातील आंतरपीक नोंदविण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. मुख्य पिकातील आंतरपीकाची नोंद करायची असेल, तर त्यासाठी एक एकर क्षेत्रापैकी अर्धा एकर ऊस आणि अर्धा एकर सोयाबीन अशी नोंद करावी लागणार. याचा अर्थ शेतकऱ्यांने एक एकर उसाची लागवड केली, तर सातबाऱ्यावर अर्धा एकरच ऊस नोंद होणार आहे. म्हणजे शेतीसाठी कर्ज हवे असल्यास पिकाचे क्षेत्र कमी आहे, हे कारण पुढे देऊन कर्ज देण्यास बॅंका टाळाटाळ करतील. 

पीकपाहणी नोंद कार्यालयातच बसून

ऑगस्ट महिन्यापासून पिकाची नोंद करण्यास सुरवात होते. तलाठ्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नोंद करावी, असा नियम आहे; मात्र तलाठी शेतातच जात नाहीत. शेतकऱ्यांनी कोणती पिके घेतली आहेत, याची माहिती अंदाजे घेऊन कार्यालयातच पिकाची नोंद केली जाते. यामुळे सातबारात किती टक्के पिकांची नोंद खरी असते, असाही प्रश्न आहे.

आंतरपिकांची नोंद व्हावी

मुख्य पिकातील आंतर पीक घेऊन शेतकरी आर्थिक सक्षम होण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातच शासनाने सोयाबीन, मूग, उडीद पिकासह अन्य पिकांना हमीभाव दिला आहे. त्याची विक्री करायची असेल, तर सातबाऱ्यावर पिकाची नोंद महत्वाची आहे. परंतु, ऑनलाइन सातबाऱ्यात आंतर पिकाची नोंद करता येत नाही. त्यामुळे या सातबाऱ्यावर आंतर पिकाची नोंद व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.  

शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करते. परंतु, सातबाऱ्यावर आंतरपिकाची नोंद नसल्याने त्याचा लाभ घेता येत नाही. ऑनलाइन साताबाऱ्यावर आंतरपिक आणि दुपार पिकाची नोंद होत नसल्याने हा नियम मारक ठरणारा आहे. 
- सुभाष वडेर, ब्रह्मनाळ, ता. पलूस


इतर ताज्या घडामोडी
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...
अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी...सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील...
नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटलनगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम...